Cyber Fraud: सायबर फ्रॉडवर कारवाईसाठी सरकार ॲक्शन मोडवर, आता आणणार खास ॲप?

Cyber Fraud: गेल्या 3 ते 4 महिन्यांत डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Government on action mode to take action on cyber fraud, will now bring a special app
Government on action mode to take action on cyber fraud, will now bring a special app Sakal
Updated on

Cyber Fraud: आजच्या काळात कोणतेही पेमेंट करण्यासाठी रोखीचा वापर पूर्णपणे कमी झाला आहे. कारण पेमेंट करण्यासाठी बहुतांश लोक डिजिटल पद्धतीचा वापर करत आहेत. वाढत्या डिजिटल पेमेंटमुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या 3 ते 4 महिन्यांत डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटची ही वाढती फसवणूक थांबवण्यासाठी सरकार विविध योजना राबविण्याचा विचार करत आहे.

आरबीआय, ट्राय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आयटी मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत डिजिटल फसवणुकी संदर्भात बैठक झाली. वाढत्या सायबर फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर सरकार येत्या काळात पाळत ठेवण्यासह इतर अनेक कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यासाठी सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय ठेवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

Government on action mode to take action on cyber fraud, will now bring a special app
Charlie Munger Passes Away: वॉरेन बफे यांचे विश्वासू सल्लागार चार्ली मुंगेर यांनी वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा आर्थिक फसवणुकीत गुंतलेले 70 लाख मोबाइल क्रमांक निलंबित केले आहेत. आणि सुमारे 900 कोटी रुपयांची फसवणूक थांबवली आहे.

बँकांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात बँकिंग प्रणाली सक्षम करण्यास सांगितले आहे, असे वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी आर्थिक सायबर सुरक्षा आणि वाढत्या डिजिटल पेमेंट फसवणुकीशी संबंधित समस्यांवरील बैठकीनंतर सांगितले.

ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी समाजात सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे जोशी म्हणाले.

बैठकीदरम्यान गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) मध्ये नोंदवलेल्या डिजिटल पेमेंट फसवणुकीचा नवीन डेटा शेअर केला आहे.

Government on action mode to take action on cyber fraud, will now bring a special app
Gold At Record High: सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड, सोने सर्वकालीन उच्चांकावर

या आर्थिक फसवणुकीचे विविध स्त्रोत, फसवणूक करणार्‍यांची मोडस ऑपरेंडी, आर्थिक सायबर गुन्ह्यांचा सामना करताना भेडसावणार्‍या आव्हानांवर सादरीकरण केले. शिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या प्रतिनिधींनी SBI द्वारे लागू केलेल्या प्रोअॅक्टिव्ह रिस्क मॉनिटरिंग (PRM) धोरणावर एक संक्षिप्त सादरीकरण केले. या बैठकीदरम्यान डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवीन ॲप लाँन्च करण्यावरही चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.