Women's Day 2024 : महिलांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? 'या' सरकारी योजना करतील मोठी मदत.. जाणून घ्या

Business Schemes for Women : काही महिलांना भांडवलाअभावी त्यांचा व्यवसाय मोठा करता येत नाही. पण सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करु शकता.
Women Business Schemes
Women Business SchemeseSakal
Updated on

Govt Schemes for Women Entrepreneur : महिला आजच्या काळात कुठेही मागे नाहीत.अगदी गृहीणीसुद्धा नवनवीन क्लृप्त्या शोधून चार पैसे कमावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशात काही महिलांना भांडवलाअभावी त्यांचा व्यवसाय मोठा करता येत नाही. पण सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करु शकता. सरकारच्या या योजनांमध्ये कमी व्याजदरात कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो आणि कर्जाची परतफेडही अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी व्याजदरात करता येते. या महिला दिन 2024 निमित्त जाणून घ्या महिलांसाठीच्या काही सरकारी योजनांबद्दल...

1. मुद्रा लोन (Mudra Loan)

महिला ब्युटी पार्लर, ट्यूशन सेंटर, शिवणकामाचे दुकान किंवा इतर कोणताही व्यवसाय उघडण्यासाठी मुद्रा लोनमधून कर्ज घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. हे कर्ज तुम्हाला तीन कॅटेगरीमध्ये मिळू शकते.

मुद्रा लोनसाठीच्या तीन कॅटेगरी कोणत्या?

  • शिशू कर्ज- कर्जाची रक्कम कमाल 50,000 रुपयांपर्यंत असू शकते.

  • किशोर कर्ज- तुम्ही 50,000 ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

  • तरुण कर्ज- जर तुम्ही आधीच व्यवसाय करत असाल आणि त्याचा विस्तार करू इच्छित असाल तर तुम्हाला यातून 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

2. अन्नपूर्णा योजना (Annapurna Scheme)

एखाद्या महिलेला खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय करायचा असेल तर तिला भारत सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. कर्ज मंजूर झाल्यानंतर, पहिल्या महिन्यासाठी इएमआय (EMI) भरण्याची गरज नाही. हा हप्ता 36 मासिक इएमआयमध्ये भरावा लागेल. त्याचा व्याजदर बाजार दर आणि बँकेच्या आधारे ठरवला जातो.

Women Business Schemes
Women's Day 2024 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास केवळ व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या

3. स्त्री शक्ती योजना (Stree Shakti Yojana)

या योजनेत सरकार महिला उद्योजकांना मदत करते. जर एखादी महिला संयुक्त अर्थात जॉईंट व्यवसायात एकापेक्षा जास्त भागधारक असतील तर ती हे कर्ज घेऊ शकते. यासोबतच त्यांना इडीपीसाठी (Entrepreneurship Development Programme) राज्य सरकारकडे नोंदणी करावी लागेल. यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त कर्जावर 0.05% व्याज सवलत मिळते.

4. स्टँड अप इंडिया योजना (Stand Up India Yojana)

2016 मध्ये ही योजना महिला आणि एससी-एसटी कॅटेगरीतील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये केवळ ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्ससाठी म्हणजेच पहिल्यांदा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची रक्कम 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असू शकते.

Women Business Schemes
Women's Day Doodle : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलने दिल्या खास शुभेच्छा; आजचं डूडल पाहिलंत का?

तुम्हालाही व्यवसाय करायचा आहे आणि पुरेसं भांडवल नाही तर तुम्ही या योजनांचा विचार करु शकता. तुमच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम सरकार या योजनांच्या माध्यमातून करत आहे, त्याचा लाभ घेत आपली स्वप्न पुर्ण करा आणि या महिला दिनापासून शुभारंभ करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()