SSY: सुकन्या समृद्धी योजनेच्या मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये हवेत, तर दरमहा किती बचत करावी लागेल?

Sukanya Samriddhi Yojana: या योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
government small saving schemes sukanya samriddhi scheme how much to invest monthly for rupees 27 lakh on maturity
government small saving schemes sukanya samriddhi scheme how much to invest monthly for rupees 27 lakh on maturity Sakal
Updated on

Sukanya Samriddhi Yojana: केंद्र सरकारकडून मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात, त्यापैकी एक सुकन्या समृद्धी योजना आहे. तुम्ही मुलीचे पालक असाल आणि तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.

या योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजनेत, तुम्हाला 15 वर्ष सतत गुंतवणूक करावी लागेल. ही योजना 21 वर्षांनी परिपक्व होईल.

तुम्ही या योजनेत दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवले तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता. सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8 टक्के व्याज आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवल्यास वार्षिक 60,000 रुपये जमा होतील. अशा प्रकारे, तुम्ही 15 वर्षांत एकूण 9 लाखाची गुंतवणूक कराल. तुमच्या रकमेवर 8 टक्के दराने व्याज जोडले जाईल.

government small saving schemes sukanya samriddhi scheme how much to invest monthly for rupees 27 lakh on maturity
Narayana Murthy: आठवड्यातून 70 तास काम करण्याचा नारायण मूर्तींचा सल्ला! सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राडा

आता तुम्ही Sukanya Samruddhi Yojana कॅल्क्युलेटरनुसार हिशोब केला तर तुम्हाला तुमच्या एकूण 9 लाखाच्या गुंतवणुकीवर 17 लाख 93 हजार 814 रुपये व्याज मिळेल, जे तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट असेल.

तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 26,93,814 रुपये म्हणजेच अंदाजे 27 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही ही गुंतवणूक 2023 मध्ये सुरू केली तर तुम्हाला 2044 मध्ये मॅच्युरिटी रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलीच्या गरजेनुसार तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नात खर्च करू शकता.

government small saving schemes sukanya samriddhi scheme how much to invest monthly for rupees 27 lakh on maturity
RBI Rule: खबरदार जर तुम्ही कर्जदारांना सकाळी आठ अन्... RBIने एजंटला दिली ताकीद

सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजाचा तिमाही आधारावर आढावा घेतला जातो. यामध्ये, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. तुम्ही कमाल 1.50 लाख रुपयांवर कर सवलतीचा दावा करू शकता.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.