Small Savings Schemes Interest Rate: अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी सरकारने काही योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
सरकारने 2 वर्षांच्या ठेवींवर 0.10 टक्के वाढ जाहीर केली आहे, तर 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 0.30 टक्के वाढ जाहीर केली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी सरकारने ही वाढ केली आहे.
मात्र, सरकारने पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
अर्थ मंत्रालयाने माहिती दिली
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पाच वर्षांच्या आवर्ती ठेवीवर (RD) सर्वाधिक 0.3 टक्के व्याज वाढवण्यात आले आहे. व्याजदरांमध्ये बदल केल्यानंतर, पोस्ट ऑफिसमधील एक वर्षाच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज 0.1 टक्क्यांनी वाढून 6.9 टक्के होईल. तसेच दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज आता 7.0 टक्के असेल, जे आतापर्यंत 6.9 टक्के होते.
सरकार दर तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेते. गेल्या वेळी, सरकारने एप्रिल-जून 2023 तिमाहीसाठी बहुतेक लहान बचत योजनांच्या व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती.
गेल्या वेळी NSC वर व्याज वाढले होते
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, एप्रिल-जून 2023 मध्ये, फक्त एका लहान बचत योजनेच्या व्याजदरात बदल झाला. त्यानंतर 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) व्याज 0.70 टक्क्यांनी वाढवून 7.7 टक्के करण्यात आले.
सलग तिसऱ्या तिमाहीत ही वाढ करण्यात आली आहे, या बदलापूर्वी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सर्वाधिक 8.2 टक्के व्याज मिळत होते.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून पॉलिसी रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ करून 6.5 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे ठेवींवरील व्याजदरही वाढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.