Daughter’s Day 2024 : भारत सरकारच्या या योजनांमध्ये गुंतवा लेकीसाठी पैसे,शिक्षण,लग्नाच्या सर्व चिंता होतील दूर

Govt Schemes For Girl Child : लेकीला समजू नका भार, तिच करेल तुमचा सांभाळ; मुलींच्या भविष्यासाठी सरकारच्या या योजना आहेत खास
Daughter’s Day 2024
Daughter’s Day 2024esakal
Updated on

Govt Schemes For Girl Child :

अलिकडच्या काळात लेकीच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. पण, अगदी काहीच वर्ष आधीपर्यंत लेक झाली की नाकं मुरडली जात होती. लेक म्हणजे खर्च, लेक म्हणजे ओझं असंच वाटायचं. पण, भारत सरकारने लोकांचा हा दृष्टिकोन बदलला आहे.

भारत सरकारच्या प्रत्येकासाठी अनेक योजना आहेत.त्यामध्ये अनेक योजना या मुलींसाठी आहेत. भारत सरकारने मुलींच्या शिक्षणाची अन् लग्नाची तरतूद होईल, अशा काही योजना मुलींसाठी राबवत आहे. त्यामुळे, अनेक पालकांच्या डोक्यावरचा भार कमी झाला आहे.

आज जागतिक कन्या दिवस आहे.तुमच्याही घरी मुली असतील तर आज त्यांना एखादं छोटंस गिफ्ट नक्की द्या. तसेच, मुलींसाठी काही योजनांमध्ये पैसे नक्की गुंतवा. ज्यामुळे, मुलींच्या शिक्षणाला कशाची कमी पडणार नाही. (Daughter’s Day 2024)

Daughter’s Day 2024
Girl Student Fee: विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई; सरकारनं जाहीर केले हेल्पलाईन नंबर

भारत सरकार मुलींसाठी राबवत असलेल्या योजना कोणत्या हे जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme)

सुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत योजना आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेवर तुम्हाला 7.6 टक्के व्याज दिले जाते. यामध्ये तुम्हाला एका वर्षात किमान 250 रुपये गुंतवावे लागतील आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

या योजनेत तुम्ही 18 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तुम्ही या योजनेतून रक्कम काढू शकता. या योजनेचा कालावधी 21 वर्षे आहे.

Daughter’s Day 2024
Girl Student Fee: विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई; सरकारनं जाहीर केले हेल्पलाईन नंबर

बालिका समृद्धी योजना (Balika Samridhi Yojana)

बालिका समृद्धी योजना ही सुकन्या समृद्धी योजनेसारखी आहे. या योजनेत मुलीच्या जन्माच्या वेळी 500 रुपये दिले जातात. शाळेच्या काळात मुलीला 300 ते एक हजार रुपयांपर्यंत वार्षिक मदत दिली जाते.यामध्येही शासनाकडून व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवलेली रक्कम तुमच्या मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर काढली जाऊ शकते.

‘बालिका समृद्धी योजना’ ही शिष्यवृत्ती योजना आहे. त्याचा फायदा दारिद्र्यरेषेखालील मुलींना आणि त्यांच्या मातांना होतो. मुलींची स्थिती सुधारणे, लग्नाचे वय वाढविणे आणि शाळांमध्ये मुलींचा वाटा वाढविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Daughter’s Day 2024
CM Eknath Shinde Government: "शिंदे सरकार हिंदुत्ववादी, तरीही अल्पसंख्याकांना..." अब्दुल सत्तार हज हाऊसमध्ये नेमकं काय म्हणाले?

उडान योजना (CBSE UDAN SCHEME)

CBSE उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जात आहे. या योजनेत मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय मंत्रालयाकडून अभ्यास साहित्यासह प्री-लोडेड टॅब्लेटही पुरविण्यात येतात. या योजनेचा उद्देश मुलींना सक्षम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाच्या इयत्ता अकरावीमध्ये शिकणारा कोणतीही विद्यार्थीनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकते. यात विज्ञान आणि गणिताकडे विशेष लक्ष दिले जाते.

शाळेच्या काळातही या योजनेचा फायदा होतो. सीबीएसई उडान योजनेअंतर्गत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी विनामूल्य सामान आणि ऑनलाईन व्हिडिओ अभ्यास सामग्री दिली जाते.

लाडकी लक्ष्मी योजना (Ladki Laxmi Yoajana)

‘लाडली लक्ष्मी योजना’ ही मध्य प्रदेश सरकारची योजना आहे. 2006 साली या योजनेची सुरुवात झाली. बालविवाह आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्याचा उद्देश या योजनेचा आहे. यामध्ये मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये मुलीच्या सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 2 हजार रुपये, नववीत प्रवेश घेतल्यावर 4 हजार रुपये आणि 12वीत प्रवेश घेतल्यावर 6 हजार रुपये दिले जातात मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतिम पैसेही दिले जातात.

या योजनेअंतर्गत दरवर्षी तुमच्या मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात सहा हजार रुपये गुंतविले जातात. सहाव्या वर्गात दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली जाते. नऊ वर्षांत चार हजारांची गुंतवणूक केली जाते.

Daughter’s Day 2024
‘मध्यान्ह भोजन योजने’ची शाळा चांगलीच शिजतेय

माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashri)

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी सुरू केली आहे. यामध्ये लाभार्थी मुलगी आणि तिची आई यांचे संयुक्त खाते बँकेत उघडले जाते. या योजनेअंतर्गत मुलीला 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()