Mera Bill Mera Adhikar: फक्त 200 रुपयांची खरेदी करा अन् 1 कोटी रुपये जिंका, काय आहे सरकारी योजना?

Mera Bill Mera Adhikar: ही योजना 1 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.
Mera Bill Mera Adhikar
Mera Bill Mera AdhikarSakal
Updated on

Mera Bill Mera Adhikar: तुम्हाला फक्त 200 रुपयांच्या खरेदीवर 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकायचे आहे का? सरकार 1 सप्टेंबरपासून 'मेरा बिल मेरा अधिकार' नावाची जीएसटी योजना सुरू करत आहे.

या योजनेअंतर्गत लोकांना 200 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे GST बिल अपलोड करावे लागेल आणि त्यावर रोख बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

ही जीएसटी इनव्हॉइस प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने सुरू केली आहे. प्रत्येक खरेदीसाठी ग्राहकांना बिल/जीएसटी इनव्हॉइस मागण्याची सवय लावणे हा यामागचा उद्देश आहे.

Mera Bill Mera Adhikar
Rice Exports: निर्यातबंदी असतानाही भारत 'या' देशात पाठवणार तांदूळ, मोदी सरकारने सांगितले कारण

ही योजना 1 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. सुरुवातीला ही योजना आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या राज्यांमध्ये सुरू केली जाईल.

GST पुरवठादारांकडून (आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि पुद्दुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत) ग्राहकांना जारी केलेले सर्व B2C इनव्हॉइस या योजनेसाठी पात्र असतील. इनव्हॉइसचे किमान मूल्य रु. 200 आहे.

iOS आणि Android वर उपलब्ध असलेल्या 'मेरा बिल मेरा अधिकार' या मोबाईल अॅप्लिकेशनवर तसेच वेब पोर्टल 'web.merabill.gst.gov.in' वर GST इनव्हॉइस अपलोड करता येईल.

Mera Bill Mera Adhikar
Home Loan: महागाईत SBI देतेय स्वस्त गृहकर्ज, लाभ घेण्याची आज शेवटची संधी, काय आहे ऑफर?

एक व्यक्ती एका महिन्यात जास्तीत जास्त 25 चलन अपलोड करू शकते. प्रत्येक अपलोड केलेल्या चलनाला एक पावती संदर्भ क्रमांक (ARN) मिळेल जो बक्षीसासाठी वापरला जाईल.

इनव्हॉइस अपलोड करताना, तुम्हाला पुरवठादाराचा/दुकानाचा जीएसटीआयएन, इन्व्हॉइस नंबर, इनव्हॉइस तारीख, इनव्हॉइस व्हॅल्यू आणि ग्राहकाचे राज्य/केंद्रशासित प्रदेश यासारखे तपशील देखील द्यावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.