Rajiv Jain On LIC Shares : माझं ते चुकलं...! अदानींना संकटातून बाहेर काढणाऱ्या राजीव जैन यांनी LIC वरून व्यक्त केला पश्चाताप

Rajiv Jain On Investment in LIC Shares : उद्योग जगतात मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेले अब्जाधीश राजीव जैन (Rajiv Jain) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Rajiv Jain On Investment in LIC Shares
Rajiv Jain On Investment in LIC Sharesesakal
Updated on

Rajiv Jain On Investment in LIC Shares Latest News : उद्योग जगतात मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेले अब्जाधीश राजीव जैन (Rajiv Jain) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला वाईट काळात पाठिंबा दिल्याने ते चर्चेत आले होते. त्यांनी अदानी ग्रुपला संकटातून सावरण्यास मोठी मदत केली. अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा त्यांना प्रचंड फायदाही झाला आणि ते एका झटक्यात अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले.

एवढं सगळं असूनही सध्या ते पश्चाताप व्यक्त करत आहेत. पण त्यामागचं कारण हे अदानी समूह नसून देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

एलआयसी (LIC Shares) मध्ये गुंतवणूक न केल्याची खंत

स्टार गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म जीक्यूजी पार्टनर्स (GQG Partners) चे सीईओ राजीव जैन यांनी एका मुलाखतीदरम्यान आपण एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यांनी एलआयसी शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी गमावली आणि या शेअर्समध्ये आलेली तुफान तेजीचा फायाद घेऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्ते केली.

भारतात सुमारे 2200 कोटी डॉलर्सच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या GQG पार्टनर्सचे राजीव जैन पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी 2023 मध्ये एलआयसीमध्ये गुंतवणूक करायला आवडली असती, पण त्यांना कोणताही ब्लॉक मिळू शकला नाही. लिक्विडिटीअभावी खरेदी करणे अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले.

Rajiv Jain On Investment in LIC Shares
Manoj Jarange : ''24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको अन्...'' मनोज जरांगेंनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा

एलआयसीचे शेअर्स तुफान तेजीत...

रजिन जैन यांनी खंत व्यक्त करावी यासाठी कारण देखील तेवढंच मोठं आहे. कारण 2024 मध्ये एलआयसीच्या शेअर्स कमालीचे तेजीत आहेत. त्याची किंमत (LIC Share Prices) 22 टक्क्यांनी वाढली आहे. अलीकडेच एलआयसीच्या शेअरने उच्चांकी पातळी गाठली होती. गेल्या वर्षभराचा विचार केला तर एलआयसीच्या शेअरच्या किंमतीत 450 रुपयांची वाढ झाली असून या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 75.27 टक्के परतावा दिला आहे. सध्या एलआयसी चा शेअर 1046.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअर्सच्या वाढीमुळे एलआयसीचे मार्केट कॅपिटलायझेशन 6.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून देशातील टॉप-10 व्हॅल्युएबल कंपन्यांमध्ये एलआयसीचा समावेश आहे.

Rajiv Jain On Investment in LIC Shares
ICC Test Rankings : सर्फराज खानने पदार्पणासह ICC कसोटी क्रमवारीत मारली एन्ट्री! दिग्गजांना टाकले मागे

अदानींच्या वाईट काळात दिली साथ

मागच्या वर्षी 2023 मध्ये अदानी ग्रुपबद्दल Hindenburg ची रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी कंपन्यांचे शेअर कोसळले होते आणि मार्केट कॅप देखील कमी झाली होती.यानंतर अदानी यांच्या संपत्तीत देखील अवघ्या दोन महिन्यांच्या काळात 60 अब्ज डॉलर्सची घट देखील झाली होता. अशा संकटाच्या काळात राजीव जैन यांनी अदानी ग्रुपला मदत करत मोठी गुंतवणूक केली होती. राजीव जैन अदानीयांच्या चार कंपन्यात 2023 मध्ये 15,446 कोटी रुपये गुंतवले होते.

कॉर्पोरेट डेटाबेस एसेइक्विटीमधून मिळालेल्या डेटानुसार राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील जीक्यूजी पार्टनर्सने स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड अदानी ग्रुपच्या 10 पैकी सहा मोठ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली. यामध्ये अदानी पॉवर लिमिटेड (Adani Power Ltd), अदानी एनर्जी सॉल्युशन्स लिमिटेड (Adani Green Energy Ltd), अदानी पोर्ट्स अँड एसइझेड( Adani Port's) आणि अंबुजा सीमेंट्स (Ambuja Cements) मध्ये गुंतवणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.