ग्रॅन्युअल्स इंडिया;(शुक्रवारचा बंद भाव : रु. ४९०)

ग्रॅन्युअल्स इंडिया ही हैदराबादमधील औषधनिर्मिती क्षेत्रातील एक कंपनी आहे. कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय), फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन इंटरमीडिएट्स (पीएफआय) व ‘एफडी’ (फिनिश्ड डोसेज) वापरण्यास तयार उत्पादन डोसदेखील तयार करते.
Granules India
Granules Indiasakal
Updated on

ग्रॅन्युअल्स इंडिया ही हैदराबादमधील औषधनिर्मिती क्षेत्रातील एक कंपनी आहे. कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय), फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन इंटरमीडिएट्स (पीएफआय) व ‘एफडी’ (फिनिश्ड डोसेज) वापरण्यास तयार उत्पादन डोसदेखील तयार करते. कंपनीचा ‘पॅरासिटामॉल’च्या जागतिक बाजारपेठेत सुमारे ३० टक्के वाटा आहे. आगामी काळात कंपनीने ‘सीएनएस’ आणि ‘ऑन्कोलॉजी’मध्ये जटिल औषधांच्या विकासासाठी संशोधन आणि विकास खर्च वाढवण्याची योजना आखली आहे. याव्यतिरिक्त मेटफॉर्मिन; तसेच पॅरासिटामॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख घटकांची निर्मिती करून उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

व्यवसायवृद्धीसाठी कंपनीचे ‘जीनोम व्हॅली’मध्ये सुरू असलेले बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फॉर्म्युलेशन सुविधा कार्यरत झाल्यावर आणखी व्यवसायवृद्धी अपेक्षित आहे. कंपनीकडे नव्या औषधाच्या मंजुरीसाठी सध्या ७५ डॉसियर मंजूर आहेत; तसेच आगामी काळात आणखी २१ जागतिक डॉसियर मंजूर होऊ शकतात. कच्च्या मालाच्या किमतींमधील घसरण, नव्या भौगोलिक क्षेत्रात व्यवसायविस्तार, बॅकवर्ड इंटिग्रेशन -पुरवठा साखळीवर अवलंबून असलेली काही कार्ये स्वतः उत्पादन करून कंपनीने केलेले व्यवसाय एकीकरण दीर्घकालीन व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने सकारात्मक संकेत देत आहेत.

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ११७६ कोटी रुपये झाला आहे; तसेच कंपनीचा निव्वळ नफा १३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च २०२४ पर्यंत वर्षभरात कंपनीचा एकूण निव्वळ नफा ४०५ कोटींवर पोहचला आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, डिसेंबर २०२० पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविले आहेत. गेल्या आठवड्यात ४८० रुपये या पातळीच्या वर बंद भाव देत या शेअरने तेजीचे संकेत दिले आहेत. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर : या लेखातील

माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून

दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.