पानिपत, की गुंतवणुकीची उत्तम संधी?

मागच्या वर्षभर प्रचंड वेगाने धावणाऱ्या स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअरना गेल्या बुधवारी जोरदार धक्का बसला आणि दोन्ही इंडेक्स ४-५ टक्के घसरले.
Investment opportunity
Investment opportunitysakal
Updated on

- मयुरेश रावेतकर, सर्टिफाईड फायनान्शिल प्लॅनर

मागच्या वर्षभर प्रचंड वेगाने धावणाऱ्या स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअरना गेल्या बुधवारी जोरदार धक्का बसला आणि दोन्ही इंडेक्स ४-५ टक्के घसरले. शेअर बाजारात आणि गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली. अचानक झालेल्या घसरणीची चर्चा जास्त होत असल्यामुळे नेमके काय झाले आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे.

बाजारातील घसरणीची कारणे

1) साधारणपणे फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या शिखर संस्थेने म्हणजे ‘ॲम्फी’ने म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या स्मॉल आणि मिड कॅप योजनांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग कमी करायला सांगितले.

2) त्याचबरोबर फंडांची एक प्रकारची ताण चाचणी (स्ट्रेस टेस्ट) करायला सांगितली. थोडक्यात, स्मॉल आणि मिड कॅप योजनांना बाजारातून गुंतवणूक काढायला किती वेळ लागेल, याची चाचपणी करणे.

3) त्यापाठोपाठ, ‘सेबी’च्या प्रमुखांनी एका कार्यक्रमात, स्मॉल कॅप आणि मिड कॅप विभागात सतत येणाऱ्या गुंतवणुकीमुळे बुडबुडे तयार होऊ शकतात; ज्यामुळे पुढे मोठा फुगा तयार होऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली.

4) ‘सेबी’च्या प्रमुखांनी SME IPO विभागात काही लहान कंपन्यांच्या किमतीमध्ये जास्त बदल झाल्याने त्यावर जास्त लक्ष ठेवण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बाजारात भीती निर्माण झाली.

ही गुंतवणुकीची योग्य संधी आहे?

साधारणपणे मार्च महिन्यात बाजार थोडा खाली जातो, असा सर्वसाधारण अनुभव आहे. पण त्याहीपेक्षा गेले वर्षभर स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर प्रचंड वाढलेले असल्याने त्यामध्ये नफावसुली होणार, हे गृहीतच होते. उदाहरणार्थ, गेल्या वर्षभरात ‘निफ्टी स्मॉल कॅप १००’ इंडेक्स हा ८६८२ अंशांवरून १६,६९१ आणि ‘निफ्टी मिड कॅप १००’ हा इंडेक्स २९,२०० अंशांवरून ४९,७८० पर्यंत वर गेला आहे. त्यात वरील सर्व कारणांनी बाजाराला खाली यायला बळ मिळाले. त्यातच लोकसभा निवडणूक अगदीच तोंडावर आली असल्याने बाजार आणि गुंतवणूकदार जास्त सावध प्रतिक्रिया देत आहेत. त्या अनुषंगाने गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, यावर एक नजर टाकू या.

1) अर्थव्यवस्थेच्या मूलभूत घटकांमध्ये कोणतेही बदल झालेले नसल्यामुळे जास्त घाबरू नये. भारतीय अर्थव्यवस्था उत्तम वाढत आहे.

2) बाजारात घसरण झाली म्हणून व पुढे अजून होईल म्हणून घाबरून गुंतवणूक काढून घेऊ नये.

3) स्मॉल आणि मिड कॅप योजनांमध्ये गुंतवणूक ही दीर्घकाळासाठीच करावी.

4) बाजार वर जात असताना गुंतवणूकदाराने जास्त गुंतवणूक करणे आणि खाली जात असताना गुंतवणूक काढून घेणे, हे टाळावे.

5) ‘सेबी’ आणि ‘ॲम्फी’ यांनी सध्या घेतलेले निर्णय हे स्मॉल आणि मिड कॅप बाजारासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी योग्यच आहेत. यामुळे या क्षेत्रातील काही चुकीच्या पद्धती बंद होतील, हे समजून घ्यावे.

6) छोट्या गुंतवणूकदारांनी दरमहा SIP द्वारे गुंतवणूक चालू ठेवायला काहीच हरकत नाही.

7) ज्यांनी आधीच एकरकमी मोठी गुंतवणूक केली आहे, त्यांनीदेखील त्यांची गुंतवणूक आहे तशीच ठेवावी.

8) आगामी संभाव्य धोके टाळण्यासाठीच ‘सेबी’ने सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे त्याचा जास्त ऊहापोह करू नये. सध्या ‘सेबी’ने आणि ‘ॲम्फी’ने घेतलेले निर्णय हे म्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणूक व्यवस्थापनासाठी दिलेले दिशानिर्देश आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे.

थोडक्यात, अजून काही काळ स्मॉल आणि मिड कॅप बाजारात थोडीफार अस्थिरता दिसू शकते. वरच्या पातळीवरून १०-१५ टक्के झालेली घट अजून थोडी वाढू शकते; पण दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असू शकते. उत्तम परतावा हा नेहमी बाजारात घट झाल्यावर केलेल्या गुंतवणुकीतूनच मिळतो. त्यादृष्टीने आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन पुढील निर्णय घ्यायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.