GST Collection: सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन एक लाख ६४ हजार ८८२ कोटी रुपये झाले आहे. डिसेंबर २०२२ मधील १.५० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १०.३ टक्के वाढ झाली आहे, तर नोव्हेंबर २०२३ मधील १.६८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये घट झाली आहे. अर्थ मंत्रालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
डिसेंबर महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १३ टक्क्यांनी जास्त होता. या आर्थिक वर्षात १.६० लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी संकलन झालेला हा सातवा महिना आहे.
वर्ष २०२३च्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण १४.९७ लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील १३.४० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १२ टक्के वाढ झाली आहे.
डिसेंबरमधील एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी ३०,४४३ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३७,९३५ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ८४,२५५ कोटी रुपये व उपकर १२,२४९ कोटी रुपये होता.
या दरम्यान, आयकर विभागाने 2023-24 च्या मूल्यांकन वर्षात एकूण 8.18 कोटी आयटीआर दाखल केल्याची आकडेवारी जारी केली आहे. 31 डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या एकूण आयटीआरनंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
मागील मूल्यांकन वर्ष 2022-23 च्या तुलनेत यावर्षी 9 टक्के अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत 1.60 कोटी लेखापरीक्षण अहवालही दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.