GST Collection: नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटींवर; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

GST Collection Update: गेल्या महिन्याच्या तुलनेत जीएसटी संकलनात 2 टक्के घसरण झाली आहे.
GST Collection
GST CollectionSakal
Updated on

GST Collection Update: नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये झाल्याची माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे. तर गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये होते. गेल्या महिन्याच्या तुलनेत जीएसटी संकलनात 2 टक्के घसरण झाली आहे.

जीएसटी संकलनात दरवर्षी 15.1 टक्के वाढ झाली आहे. हा सलग नववा महिना आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे.

नोव्हेंबरमध्ये सीजीएसटी संकलन 30,400 कोटी रुपये होते, तर एसजीएसटी संकलन 38,200 कोटी रुपये होते. याशिवाय नोव्हेंबरमध्ये IGST कलेक्शन 87,000 कोटी रुपये होते. गेल्या 7 महिन्यांत एकूण 1.6 लाख कोटी रुपयांचा टप्पा 5 वेळा ओलांडला आहे.

GST Collection
RBI Action: रिझर्व्ह बँकेने HDFC, BOAला ठोठावला दंड; सहकारी बँकांवरही केली कारवाई, काय आहे प्रकरण?

सरासरी मासिक संकलन 1.67 लाख कोटी

जीएसटीच्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये सरासरी मासिक संकलन 1.67 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या काही वर्षांत मासिक जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. 2020-21 च्या कोरोनानंतर 2022-23 मध्ये संकलन वाढून सरासरी 1.51 लाख कोटी रुपये झाले.

जीएसटी संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप 5 राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचे जीएसटी संकलन 18% वाढून 25,585 झाले आहे.

GST Collection
तुमच्याही बँक खात्यातून पैसे कापले गेलेत का?SBIसह अनेक बँकांचे ग्राहक चिंतेत, काय आहे कारण?

केंद्र सरकारला 2023-24 च्या अर्थसंकल्पात जीएसटी संकलनात 12% वाढ अपेक्षित होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत जीएसटी संकलन 13.32 लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 11.9% अधिक आहे.

अलीकडेच सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले होते की जुलै-सप्टेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.6 टक्के होती, जी अपेक्षेपेक्षा चांगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.