GST Collection in October 2024: सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर संकलन 1,87,346 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबरमधील 1.72 लाख कोटी रुपयांपेक्षा 8.9 टक्के अधिक आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.73 लाख कोटी रुपये होते. जीएसटी रिफंड जारी केल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात एकूण संकलन 8 टक्के वाढीसह 1,68,041 कोटी रुपये झाले आहे.