GST Rate Cut on Millets: बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांचा मोठा निर्णय

GST Council Meet Decision: जीएसटी परिषदेची 52वी बैठक सुरू आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharamansakal
Updated on

GST Council Meet Decision: जीएसटी परिषदेची 52वी बैठक सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुषमा स्वराज भवनात होत आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री (विधीमंडळासह) आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी याशिवाय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हेही या बैठकीला उपस्थित आहेत. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेने बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या खाद्यपदार्थावरील GST सध्याच्या 18% GST वरून कमी करून 5% करण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलने शनिवारी बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या प्रॉडक्टवर जीएसटी 5 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 18 टक्के जीएसटी दर लागू होता.

जीएसटी कौन्सिलच्या फिटमेंट कमिटीने यापूर्वीच बाजरीच्या प्रॉडक्टवर सूट देण्याची शिफारस केली होती. मात्र, बाजरीपासून तयार होणाऱ्या मालावर कोणतेही प्रोत्साहन देण्यास समितीने नकार दिला होता.

Nirmala Sitharaman
2000 Rupees Notes: 2,000 रुपयांच्या नोटा आज होणार रद्दी? आजच जमा करा, RBI गव्हर्नर म्हणाले...

भारत 2023 हे वर्ष 'बाजरी वर्ष' म्हणून साजरे करत आहे आणि सरकार बाजरीच्या उत्पादनाला आणि वापराला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले होते की बाजरी ही हवामान अनुकूल आहे आणि कमी पाण्यात आणि खते आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून पिकवता येते. शेतकरी, पर्यावरण आणि ग्राहकांसाठी बाजरी हे चांगले पीक बनवण्यासाठी सरकार 'मिशन मोड'वर काम करत आहे.

Nirmala Sitharaman
ICC World Cup 2023: वर्ल्डकप करणार मालामाल! 'या' कंपनीचा शेअर पाडणार पैशांचा पाऊस, तुमच्याकडे आहे का?

कर दर, धोरणातील बदल आणि प्रशासकीय समस्यांसह GST प्रशासनाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी GST परिषद वेळोवेळी बैठक घेते. भारताची अप्रत्यक्ष कर रचना तयार करण्यात GST परिषद महत्त्वाची भूमिका बजावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()