GST Fraud: देशात GST म्हणजेच गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स लागू होऊन जवळपास 6 वर्षे झाली आहेत. मात्र आत्तापर्यंत करचोरीचे प्रकार थांबलेले नाहीत. हे थांबवण्यासाठी सरकार सर्व यंत्रणांमध्ये बदल आणि सुधारणा करत आहे. तरीही लोक फसवणूक करत आहेत.
दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून करचुकवेगिरीची प्रकरणे समोर येत असतात. करचुकवेगिरीचे ताजे प्रकरण कानपूर येथे घडले आहे. जिथे करोडोंचा घोटाळा झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी संकलन 1.50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत फसवणूक थांबवणे हेही सरकारसाठी आव्हान बनले आहे. वेगवेगळ्या युक्त्या अवलंबून चोरटे कर चोरी करत आहेत.
जाणून घ्या काय आहे कानपूरचा नवीन GST घोटाळा?
जीएसटी चोरी घोटाळ्याचे ताजे प्रकरण कानपूरचे आहे, जिथे गेल्या आठवड्यात जीएसटी आणि आयकराची मोठी चोरी उघडकीस आली होती. भंगाराचे काम करण्याच्या नावाखाली करोडोंची करचोरी केली जात होती.
आरोपी भंगार विक्रेते, बॅटरी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांना बनावट बिले पुरवायचे. ज्या लोकांकडून तो या बनावट बिलांमध्ये वस्तू खरेदी करून दाखवत असे ते दुसरे तिसरे कोणी नसून रिक्षावाले आणि कचरा वेचणारे गरीब लोक होते.
यानंतर ते बनावट आयटीसी क्लेम आणि जीएसटीमध्ये सूट घेत असत. आरोपींनी 250 कोटींहून अधिकचे व्यवहार करून सरकारचे 80 कोटींहून अधिक नुकसान केले आहे.
नोएडामध्ये 5 वर्षांपासून जीएसटी घोटाळा सुरू होता
नुकतेच नोएडामध्ये बनावट फर्म तयार करून जीएसटीमध्ये फेरफार केल्याचे प्रकरण समोर आले होते. चुकीच्या पद्धतीने जीएसटी क्रमांक तयार करून माल न पोहोचवता बनावट बिले तयार करत असल्याचे उघड झाले आहे.
यानंतर जीएसटी रिफंड घेऊन सरकारच्या महसुलाचे हजारो कोटींचे नुकसान करत होते. अशा बनावट कंपन्या तयार करून ही बनावट टोळी गेली 5 वर्षे फसवणूक करत होती.
16 राज्यांमध्ये जीएसटी घोटाळा सुरू होता
केंद्र सरकारने जीएसटी चोरी शोधण्यासाठी 16 मे ते 15 जून दरम्यान विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेचा उद्देश बनावट बिले, बनावट जीएसटी नोंदणी आणि चुकीचे इनपुट टॅक्स घेणारे शोधणे हा आहे.
फसवणूक करणारी जीएसटी खाती आणि बनावट बिले देणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासह इतर एजन्सींचा समावेश आहे.
या मोहिमेअंतर्गत पहिल्या आठवड्यातच 10 हजार बनावट नोंदणी आढळून आल्या. या मोहिमेअंतर्गत गैरप्रकारांनी सरकारची 30,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले. देशातील 16 राज्यांमध्ये हा बनाव सुरू होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.