Adani Group: IPLमध्ये गौतम अदानींची एन्ट्री; अंबानींना देणार टक्कर, 'ही' टीम खरेदी करण्याच्या तयारीत

Gujarat Titans' Ownership: उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह लवकरच 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) मध्ये प्रवेश करू शकतो. आयपीएल संघातील भागभांडवल विकत घेण्यासाठी अदानी समूहाची चर्चा सुरू आहे.
Adani Group
Adani Group IPL team Sakal
Updated on

Adani Group IPL: उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह लवकरच 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) मध्ये प्रवेश करू शकतो. आयपीएल संघातील भागभांडवल विकत घेण्यासाठी अदानी समूहाची चर्चा सुरू आहे. असे झाले तर पुन्हा एकदा अंबानी-अदानी व्यवसायात एकाच मैदानात उतरतील.

आयपीएलमध्ये मोठे उद्योगपती संघ फ्रँचायझीचे मालक आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुंबई इंडियन्स सुरुवातीपासूनच मैदानात असून 2023 मध्ये या कंपनीने 359 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे आणि त्याने सर्वाधिक स्पर्धा जिंकल्या आहेत.

अदानी गुजरात टायटन्स खरेदी करणार का?

उद्योगपती गौतम अदानी आयपीएल संघ गुजरात टायटन्समधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करू शकतात. खाजगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्स गुजरात टायटन्समधील हिस्सा विकण्यासाठी अदानी समूहाशी चर्चा करत आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनी टोरेंट ग्रुपशीही याबाबत चर्चा करत आहे. उद्योगपती गौतम अदानी आयपीएल संघ गुजरात टायटन्समधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करू शकतात.

Adani Group
Gold Rate: सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक; चांदीचा भावही वाढला, 'या' 3 कारणांमुळे वाढतेय चकाकी

अदानी यांनी यापूर्वीही क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे

अदानी समूह स्पोर्ट्स फ्रँचायझी किंवा क्रिकेट खेळात गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अदानी समूहाची महिला प्रीमियर लीग (WPL) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.

CVC कॅपिटलला आता या IPL संघात अल्पसंख्याक भागधारक राहायचे आहे. म्हणूनच ती आपला बहुसंख्य हिस्सा विकत आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणताही नवा संघ ठराविक कालावधीसाठी आपला स्टेक इतर कोणालाही विकू शकत नाही. हा लॉक-इन कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे.

Adani Group
Budget 2024: नोकरीचे टेन्शन संपणार? सरकार अर्थसंकल्पात 'या' योजनांवर देणार भर

त्यामुळे CVC कॅपिटल आता संघातील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मात्र, या संदर्भात सीव्हीसी कॅपिटल, अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Houlihan Lokey च्या मते, गुजरात टायटन्सचे ब्रँड मूल्य 124 दशलक्ष डॉलर होते आणि ते क्रमवारीत आठव्या स्थानावर होते. 231 दशलक्ष डॉलर ब्रँड मूल्यासह, चेन्नई सुपर किंग्ज शीर्षस्थानी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com