Bank CEO Salary: जगदीशन बनले सर्वाधिक पगार घेणारे बँकर, 'या' बँकेचे CEO घेतात फक्त 1 रुपया पगार

देशातील सर्वात जास्त पगार घेणारे दुसरे बँकर कोण?
Bank CEO Salary
Bank CEO SalarySakal
Updated on

Highest Paid Bank Employee: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक, HDFC बँकेचे MD आणि CEO शशिधर जगदीशन हे आर्थिक वर्षात (2022-23) सर्वाधिक पगार घेणारे बँकर ठरले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांना एकूण 10.55 कोटी रुपये पगार देण्यात आला.

वार्षिक अहवालानुसार, शशिधर जगदीशन यांचे सहकारी आणि एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपये पगार दिला गेला. अशाप्रकारे, ते देशातील सर्वात जास्त पगार घेणारे दुसरे बँकर आहेत.

शशिधर जगदीशन यांच्या पगारामध्ये 10.55 कोटी रुपयांपैकी 2.82 कोटी रुपयांचे मूळ वेतन, 3.31 कोटी रुपयांचे भत्ते, 33.92 लाख रुपयांचे पीएफ आणि 3.63 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बोनस यांचा समावेश आहे.

जून तिमाहीच्या निकालांमध्ये, एचडीएफसी बँकेने 11,951.70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला, जो वार्षिक आधारावर 30 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफ्याचा आकडा 9,196 कोटी रुपये होता.

दुसऱ्या क्रमांकावर अमिताभ चौधरी

बँकेच्या सीईओच्या बाबतीत, अॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी पगाराच्या बाबतीत 9.75 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे संदीप बक्षी यांना 9.60 कोटी रुपये पगार मिळाला.

Bank CEO Salary
Nitin Desai Case: नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एडलवाईस कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

उदय कोटक यांनी एक रुपया पगार घेतला

या सगळ्यात कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी फक्त एक रुपया पगार घेतला आहे. उदय कोटक यांचा कोटक महिंद्रा बँकेत जवळपास 26 टक्के हिस्सा आहे. कोविड-19 नंतर मोबदला म्हणून त्यांनी 1 रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला होता.

Bank CEO Salary
LIC Scheme: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये महिलांना मिळू शकतो 11 लाखांचा परतावा! दररोज किती गुंतवणूक करावी लागेल?

बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ?

तिमाही निकालानंतर कोटक महिंद्रा बँक कर्मचाऱ्यांच्या पगार वाढवत आहे. बँकेने व्यवस्थापकीय कर्मचारी वगळून इतर कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारात 16.97 टक्क्यांनी वाढ केली आहे.

त्याचवेळी ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.6 टक्के वाढ झाली आहे. HDFC बँकेने कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.51 टक्क्यांनी वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.