HDFC Employee: कामाच्या तणावाने घेतला आणखी एका कर्मचाऱ्याचा जीव! सहकाऱ्यांनी सांगितले...

HDFC Employee: एका खासगी बँकेच्या महिला अधिकारी सदफ फातिमा यांचा कार्यालयात मृत्यू झाला. त्यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट केले की, कामाच्या दबावामुळे आणि तणावामुळे कार्यालयात खुर्चीवरून पडून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी खूपच चिंताजनक आहे.
HDFC bank employee in
HDFC bank employeeSakal
Updated on

HDFC Employee: एका खासगी बँकेच्या महिला अधिकारी सदफ फातिमा यांचा कार्यालयात मृत्यू झाला. त्यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट केले की, कामाच्या दबावामुळे आणि तणावामुळे कार्यालयात खुर्चीवरून पडून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी खूपच चिंताजनक आहे. अखिलेश यांनी पुढे लिहिले की, अशा बातम्या अर्थव्यवस्थेच्या दबावाचे प्रतीक आहेत.

सदफ फातिमा लखनौच्या विभूतीखंड येथील एचडीएफसी बँकेत काम करत होत्या. त्या बँक कार्यकारी उपाध्यक्षपदावर रुजू झाल्या होत्या. सदाफ फातिमा या लखनऊच्या वजीरगंज भागातील रहिवासी होत्या. लंच ब्रेक दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑफिसमधील सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या कामाच्या खूप तणावाखाली होता. 45 वर्षीय सदफ मंगळवारी दुपारी जेवायला बसल्या असताना बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

HDFC bank employee in
Hyundai India IPO: LICचा विक्रम मोडणार! Hyundai आणणार देशातील सर्वात मोठा IPO; सेबीने दिली मंजुरी

अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, अशा मृत्यूंना भाजप सरकार जबाबदार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, कंपन्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

काही दिवसांपूर्वी EY कंपनीची महिला कर्मचारी अॅना सेबॅस्टियन हिचा पुण्यात मृत्यू झाला होता. तीच्या आईनेही कंपनीवर कामाचा जास्त दबाव असल्याचा आरोप केला होता. आईने कंपनीच्या चेअरमनला पत्र लिहून अनेक आरोप केले होते.

HDFC bank employee in
Zerodha Scam: झिरोधामध्ये सर्वात मोठा स्टॉक ब्रोकिंग घोटाळा; 15 लोकांनी केली करोडोंची लूट, 432 बनावट खाती

आईने सांगितले की ऑफिसमध्ये कामाचा इतका ताण होता की पुण्यात ऑफिस जॉईन केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच अॅनाला आपला जीव गमवावा लागला. त्यांची मुलगी रात्री आणि अगदी वीकेंडलाही काम करायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.