एचडीएफसी म्युच्युअल फंड ही भारतातील अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. गेली अनेक वर्षे ही कंपनी गुंतवणूकदारांना विविध योजनांच्या माध्यमातून शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. या कंपनीच्या अनेक योजनांपैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या दोन योजना म्हणजे एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंड आणि एचडीएफसी इएलएसएस टॅक्स सेव्हर फंड.