दारू बनवणाऱ्या कंपनीचा अजब निर्णय, 2,600 कोटींची कंपनी फक्त 90 रुपयांना विकली

Heineken Sells Its Business: जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या दारू उत्पादक कंपनीने हा अजब निर्णय घेतला आहे
Heineken Sells Its Business:
Heineken Sells Its Business: Sakal
Updated on

Heineken Sells Its Business: जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या दारू उत्पादक कंपनीने
आपला व्यवसाय गुंडाळण्याची तयारी केली आहे. नेदरलँड्सची दारू उत्पादन करणारी कंपनी हेनेकेन, जिची बिअर तुम्ही कधी ना कधी प्यायलीच असेल.

कंपनी आता रशियातील व्यवसाय अवघ्या 90 रुपयांना विकला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. हेनकेनने रशियातील आपला 2,600 कोटींचा व्यवसाय अवघ्या 90 रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेन-रशिया युद्धानंतर हेनेकेनने व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली. कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनीचे सुमारे 300 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ते 2,600 कोटी रुपये इतके आहे.

Heineken Sells Its Business:
Swiggy IPO: स्विगीची IPO एन्ट्री कधी होणार? तारीख आणि किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

कंपनी विकण्याचे कारण काय?

आता प्रश्न असा पडतो की जगातील सर्वात मोठ्या दारू कंपनीने आपला व्यवसाय अवघ्या 90 रुपयांना का विकला? मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने युक्रेनवर सातत्याने केलेल्या हल्ल्यांमुळे हेनेकेनने रशिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Heineken Sells Its Business:
IPOs Next Week: पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात गुंतवणूकीची मोठी संधी, 'या' कंपन्यांचे IPO येणार

हेनेकेनच्या या निर्णयामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. कंपनीचे सीईओ डॉल्फ व्हॅन डेन ब्रिंक यांनी सांगितले की, हेनकेनचे 1800 कर्मचारी रशियामध्ये काम करत आहेत.

मात्र, कंपनी विकल्याने कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने त्यांना पुढील 3 वर्षांसाठी रोजगाराची हमी दिली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे रशिया सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. हेनेकेनप्रमाणेच रशियातील अनेक कंपन्या देश सोडून जात आहेत.

युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले असून त्यामुळे लोकांना रशियामध्ये व्यवसाय करणे कठीण होत आहे. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रशिया सोडून गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.