EPFO: ईपीएफओने दिली नववर्षाची भेट; पेन्शन अर्जाची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढवली

EPFO Higher Pension: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नियोक्त्यांना त्यांच्या हायर पेन्शन पर्यायासाठी तपशील भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. वेतन तपशील अपलोड करण्याची अंतिम मुदत 31 मे पर्यंत वाढवली आहे.
Higher PF pension Employers get five more months to process applications
Higher PF pension Employers get five more months to process applications Sakal
Updated on

EPFO Higher Pension: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नियोक्त्यांना त्यांच्या हायर पेन्शन पर्यायासाठी तपशील भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. वेतन तपशील भरण्याची भरण्याची अंतिम मुदत 31 मे पर्यंत वाढवली आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने बुधवारी सांगितले की ही मुदत आता पाच महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. योजनेसाठी अर्ज करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी नियोक्‍त्यांना 31 मे 2024 पर्यंत वेळ आहे.

यापूर्वीही मुदत वाढवण्यात आली

4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, हायर पेन्शन वेतन योजना 26.02.2023 रोजी सुरू करण्यात आली. पेन्शनधारक आणि सदस्यांची मागणी लक्षात घेऊन, त्यांची अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली होती.

Higher PF pension Employers get five more months to process applications
Gautam Adani: "सत्यमेव जयते" हिंडेनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गौतम अदानींची पोस्ट चर्चेत

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, जुलै 2023 मध्ये एकूण 17.49 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून हायर पेन्शन वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 3.6 लाख एकल किंवा संयुक्त पर्याय अर्ज अजूनही नियोक्त्यांकडे पडून आहेत.

ज्यावर प्रक्रिया करणे बाकी आहे. अशा परिस्थितीत, मुदत वाढवल्यानंतर, मालकांना या कर्मचार्‍यांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

Higher PF pension Employers get five more months to process applications
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

गेल्या डिसेंबरमध्ये EPFO ​​ने पगाराची आकडेवारी जाहीर केली होती. ऑक्टोबरमध्ये 15.29 लाख सदस्यांची भर पडल्याचे या आकडेवारीवरून दिसून आले. हा आकडा वार्षिक आधारावर 18.22 टक्के अधिक आहे.

ऑक्टोबर महिन्यात जोडलेल्या एकूण 7.72 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.04 लाख महिला सदस्य आहेत, ज्या पहिल्यांदाच EPFO ​​मध्ये सामील झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.