Veg Thali Price Rise: ऑक्टोबर महिन्यात घरगुती थाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती थाळीच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा वाढला आहे. मांसाहारी थाळीच्या किमतीतही 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार, या महागाईचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाज्यांच्या वाढलेल्या किमती हे आहे.