Affordable Housing Sales Falls: बँकांच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. नुकतेच 12 पेक्षा जास्त बँकांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. सरकारी बँका असो की खाजगी बँका, सगळ्यांनीच प्रचंड नफा कमावला आहे.
मात्र याचा फायदा सर्वसामान्यांना मिळण्याऐवजी त्यांचा ईएमआय वाढत आहे. प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म एनरॉकच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत गृहकर्ज घेणार्यांवर ईएमआयचा बोजा 20% वाढला आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. डीडीएकडून लोकांना सबसिडी देण्यापासून अनेक बिल्डरांनी अनेक योजनाही सुरू केल्या. परंतु परवडणाऱ्या घरांमध्ये 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या विक्रीत सुमारे 20 टक्क्यांची घट झाली आहे. खरे तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढत्या EMI चे ओझे आहे.
दोन वर्षांत EMI 5 हजार रुपयांनी वाढला
30 लाखांच्या गृहकर्जावर असलेल्या लोकांच्या ईएमआयमध्ये गेल्या 2 वर्षांत 5,000 रुपयांनी वाढ झाली आहे. फ्लोटिंग व्याजदर 2021 मध्ये 6.7 टक्के होते, जे आता 2023 मध्ये 9.15 टक्के झाले आहे.
त्यानुसार, जुलै 2021 मध्ये, जर कर्ज धारकाचा ईएमआय 22,700 रुपये असेल, तर तो आता 27,300 रुपये झाला आहे. म्हणजे 2 वर्षांत ईएमआयचा बोजा 5 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे.
EMI का वाढत आहे?
प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म एनरॉकच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत लोकांवरील ईएमआयचा बोजा 20 टक्क्यांनी वाढला आहे. देशातील मोठ्या बँकांपैकी ICICI बँक, बँक ऑफ इंडिया यांनी 1 ऑगस्टपासून MCLR दर वाढवले आहेत.
MCLR दर वाढल्याने लोकांच्या कर्जाचा EMI वाढतो. एनरॉक ग्रुपचे संशोधन प्रमुख प्रशांत गुप्ता यांच्या मते, 20 वर्षांच्या कर्जावरील लोकांचे एकूण व्याज त्यांच्या मूळ रकमेपेक्षा अधिक वाढले आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट दिसून येत आहे.
तज्ञ काय म्हणतात?
बँकांच्या मनमानीपणे वाढलेल्या व्याजदराचा परिणाम घरांच्या विक्रीवर दिसून येत असल्याचे रिअल इस्टेट तज्ज्ञांचे मत आहे. इंदुमा रियल्टीचे संस्थापक ऋषी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या किंमतींचा दोष फक्त बिल्डरांवरच टाकला जातो.
तर यामध्ये बँकांचीही जबाबदारी आहे. देशातील एक मोठा वर्ग कर्ज घेऊनच आपल्या स्वप्नातील घर बांधतो. आता व्याजदर वाढले तर लोक कर्ज घेऊन घर घेत नाहीत.
रिझर्व्ह बँकेची भूमिकाही महत्त्वाची आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात वाढ हे देखील कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सुमारे 250 आधार अंकांची वाढ केली आहे.
त्यामुळे बँकांना महागडी कर्जे मिळत असल्याने ती ग्राहकांकडून वसूल करत आहेत. एकीकडे बँका नफा कमवत आहेत, तर दुसरीकडे बिल्डर व बँका वाढीव दराचा दावा करून सर्वसामान्यांकडून कष्टाचे पैसे काढून घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.