Hotels in Ayodhya: अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा आजपासून सुरु होणार आहे. अशा स्थितीत तेथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अचानक हॉटेलच्या किंमती वाढल्या आहेत. या महिन्यामध्ये अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत.
अयोध्या राम मंदिराच्या 170 किलोमीटरच्या परिसरात लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये हॉटेल्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. मनीकंट्रोलशी बोलताना, सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे एमडी आणि संस्थापक म्हणाले की, त्यांच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी बुक झाल्या आहेत. हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 85 हजारांच्या पुढे गेले आहे.
रॅडिसनने गेल्या बुधवारी अयोध्येत पार्क इन उघडले होते आणि 21 जानेवारीपर्यंत ते पूर्णपणे बुक झाले आहे. सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी आगाऊ बुक झाल्या आहेत. त्यांची प्रत्येक खोली सुमारे 85 हजार रुपये किंमतीत आणि त्याहूनही महाग किंमतीला बुक करण्यात आली आहे. Radisson's Park Inn हॉटेल लाँच झाल्यानंतर लगेचच बुकिंग सुरु झाले होते.
22 जानेवारीला इतके लोक येण्याची शक्यता
राम मंदिर सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अयोध्येतील बहुतेक हॉटेल्स आधीच भरलेली आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये या तारखांसाठी खोल्या उपलब्ध आहेत त्यांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे.
विमान भाडेही वाढले
अयोध्येला जाणाऱ्या सर्व विमानांचे भाडे वाढले आहे. आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, बंगळुरू ते अयोध्या विमान भाडे 24,000 रुपयांनी वाढले आहे. शनिवार आणि रविवारी बेंगळुरू-अयोध्या फ्लाइट सर्वात महाग आहे.
दिल्ली ते अयोध्येचे भाडेही अनेक पटींनी वाढले आहे. 20 जानेवारीला दिल्ली ते अयोध्येचे तिकीट 11,829 रुपये आहे, तर 21 जानेवारीला त्याच तिकिटासाठी तुम्हाला 15,193 रुपये मोजावे लागतील. इतर दिवशी दिल्ली ते अयोध्या या विमानांचे विमान भाडे 3,595 रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.