Real Estate Price Hike: गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट आणि घरे महाग झाली आहेत. कोविडनंतर देशातील मालमत्तेच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये घर खरेदी करणे महाग झाले आहे. तर काही शहरांमध्ये घर खरेदी करणे स्वस्त झाले आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार, भारतात घरांच्या किंमती वाढत आहेत. या तिमाहीत ऑल इंडिया होम प्राइस इंडेक्स (HPI) मध्ये 5.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी वाढून 311.9 झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत होम प्राइस इंडेक्स 296.6 वर होता.
दिल्लीसह 'या' शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार राजधानी दिल्लीमध्ये घरांच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. जून 2023 च्या तिमाहीत राजधानी दिल्लीत HPI मध्ये 14.9 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
या यादीत आर्थिक राजधानी मुंबईचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनंतर मुंबईत घरांच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत.
आयटी सिटी बेंगळुरूमध्ये गेल्या वर्षभरात घरांच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीत लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौमध्ये घरांच्या किंमतीत दरवर्षी 4.5 टक्के वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत कानपूरमध्ये 2.5 टक्के आणि चेन्नईमध्ये 2 टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत.
'या' शहरांमध्ये घरांच्या किंमती झाल्या कमी
दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर कोलकात्यात घरांच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षभरात घरांच्या किंमतीत 6.6 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे.
गेल्या तिमाहीत येथील घरांच्या किंमती 8.2 टक्क्यांनी घसरल्या होत्या. जयपूर, राजस्थानमध्ये घरांच्या किंमतीत 2.2 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अहमदाबादमधील घरांच्या किंमती 2.1 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. वार्षिक आधारावर पाहिल्यास, 10 पैकी आठ शहरांमध्ये होम प्राइस इंडेक्स (HPI) मध्ये 2.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.