Home Loan: गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात झपाट्याने वाढ केली आहे. त्यामुळे अनेक दशकांतील नीचांकी पातळीवर सुरू असलेल्या गृहकर्जाच्या व्याजदरातही मोठी वाढ दिसून आली आहे.
त्यामुळे अनेक घर खरेदी करणाऱ्यांना अडचणी येत आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात कर्ज पूर्ण होण्याचा कालावधी त्यांच्या सेवानिवृत्तीच्याही पुढे ओलांडला आहे. (How To Reduce Home Loan Tenure If EMI Is Stretching Beyond Retirement Age)
गृहकर्जावरील व्याज किती वाढले :
वर्षभरापूर्वी देशातील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये गृहकर्जावरील सरासरी व्याजदर 6.5 टक्के होता, जो आज 9 टक्के इतका वाढला आहे. फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेतलेल्या गृहकर्ज खरेदीदारांना याचा फटका बसला आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेते. त्यामुळे जसजसा व्याजदर वाढतो तसतसा त्याचा कर्जाचा कालावधी किंवा ईएमआय वाढतो.
कर्जाचे ओझे कसे कमी करावे?
जर तुम्हीही वाढत्या व्याजदरामुळे चिंतीत असाल. खाली नमूद केलेल्या काही मार्गांनी तुम्ही तुमच्या कर्जाचा बोजा कमी करू शकता.
तुम्ही तुमचे कर्ज अशा बँकेत हस्तांतरित करू शकता जिथे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते.
कर्जाच्या मूळ रकमेचा काही भाग परत करा. यामुळे तुमचा कर्जाचा बोजा कमी होईल.
गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेशी थेट बोलणी करू शकता.
रेपो दरात 2.50 टक्के वाढ :
RBI ने मे 2022 पासून रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. यामुळे मे 2022 मध्ये रेपो दर 4.00 टक्के होता तो 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. अशाप्रकारे रेपो दर गेल्या वर्षभरात 2.50 टक्क्यांनी वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.