Horlicks: हॉर्लिक्स हेल्थ ड्रिंक श्रेणीतून बाहेर; हिंदुस्तान युनिलिव्हरने का केला बदल?

Horlicks: हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य आर्थिक अधिकारी रितेश तिवारी यांनी सांगितले की, कंपनीने हेल्थ फूड ते फंक्शनल न्यूट्रिशन ड्रिंक श्रेणीत बदल केला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा हा एक चांगला मार्ग होता.
HUL withdraws health label from Horlicks rebrands it as functional nutritional drink amid regulatory
HUL withdraws health label from Horlicks rebrands it as functional nutritional drink amid regulatory Sakal
Updated on

Horlicks: हॉर्लिक्स हे आता हेल्थ ड्रिंक राहिलेले नाही, ते आता न्यूट्रिशन ड्रिंक बनले आहे. साधारणपणे या दोघांमध्ये काही विशेष फरक नसला तरी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ई-कॉमर्स वेबसाइटना त्यांच्या सर्व संबंधित प्लॅटफॉर्मवर हेल्थ ड्रिंक श्रेणीतील पेये आणि शीतपेये काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या हेल्थ फूड ड्रिंकचे नाव बदलून न्यूट्रिशन ड्रिंक केले आहे.

याबाबत हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य आर्थिक अधिकारी रितेश तिवारी यांनी सांगितले की, कंपनीने हेल्थ फूड ते फंक्शनल न्यूट्रिशन ड्रिंक श्रेणीत बदल केला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा हा एक चांगला मार्ग होता.

HUL withdraws health label from Horlicks rebrands it as functional nutritional drink amid regulatory
Ashneer Grover: ''करदाते हे अल्पसंख्याक आहेत, देशात फक्त 0.5 टक्के मतदार आयकर भरतात'', अश्नीर ग्रोव्हर यांचे वक्तव्य चर्चेत

FSSAI ने हे आदेश दिले आहेत

यापूर्वी, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने (NCPCR) या संदर्भात आधीच सांगितले होते की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत हेल्थ ड्रिंकची कोणतीही व्याख्या नाही.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ई-कॉमर्स वेबसाइट्सना दुग्धजन्य पदार्थ, धान्य किंवा माल्ट आधारित पेय पदार्थांना हेल्थ ड्रिंक म्हणून लिस्ट करू नका असे सांगितले होते. कारण असे करणे चुकीचे आहे यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.

HUL withdraws health label from Horlicks rebrands it as functional nutritional drink amid regulatory
JP Morgan CEO: 'अमेरिकेला मोदींसारख्या नेत्याची गरज', जेपी मॉर्गनचे सीईओ यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

FSSAI ने म्हटले आहे की FSSAI कायदा 2006 अंतर्गत 'हेल्थ ड्रिंक' या शब्दाची व्याख्या नाही. अशा परिस्थितीत ते कोणत्याही उत्पादनासाठी वापरले जाऊ शकत नाही. तर 'एनर्जी ड्रिंक्स' हा शब्द फक्त कार्बोनेटेड आणि नॉन-कार्बोनेटेड वॉटर बेस्ड फ्लेवर्ड ड्रिंक्स सारख्या उत्पादनांवर वापरण्याची परवानगी आहे. नियामकाने सांगितले होते की या कारवाईचा उद्देश उत्पादनांचे स्वरूप आणि पारदर्शकता वाढवणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.