Nikhil Kamath: "आपण सगळे मरणार आहोत..." झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ असं का म्हणाले?

Nikhil Kamath: झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. नवउद्योजकांना संबोधित करताना झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले.
Hum sab marne waale hain Zerodha's Nikhil Kamath shares a life hack for struggling entrepreneurs
Hum sab marne waale hain Zerodha's Nikhil Kamath shares a life hack for struggling entrepreneurs Sakal
Updated on

Nikhil Kamath: झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. नवउद्योजकांना संबोधित करताना झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले. निखिल कामथ म्हणाले की, जोखीम घेण्यास घाबरण्याची गरज नाही कारण आपण सर्वजण एक दिवस मरणार आहोत. छोट्या-छोट्या अपयशाने खचून जाण्याची गरज नाही,'' असे त्यांनी नवउद्योजकांना सांगितले.

निखिल कामथ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'लहानपणी मला शाळेत जाणे अजिबात आवडत नसे, मी माझ्या सर्व शिक्षकांना घाबरत होतो आणि प्रत्येक गोष्टीत घाबरत होतो. माझ्यासारखे होऊ नका. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही.'' (Hum sab marne waale hain Zerodha's Nikhil Kamath shares a life hack for struggling entrepreneurs)

Hum sab marne waale hain Zerodha's Nikhil Kamath shares a life hack for struggling entrepreneurs
Disinvestment: मोदी सरकार देशातील दोन सर्वात मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

'या' गोष्टी इतक्या गांभीर्याने घेऊ नका

तरुणांना संबोधित करताना ते म्हणाले, 'कोणतीही छोटीशी गोष्ट घडली की मी गरजेपेक्षा जास्त वरचढ होऊ देत असे. पण आता मी माझ्या आयुष्यात एक मंत्र अंगीकारला… शाळा-कॉलेजमध्ये परीक्षा चांगली गेली नाही किंवा तुम्हाला आवडणारी मुलगी तुमचे ऐकत नाही.. मी या गोष्टी फारशा गांभीर्याने घेत नाही. 'आपण सगळे मरणार आहोत'. असा विचार करून जीवनात आणखी मजा करा!

Hum sab marne waale hain Zerodha's Nikhil Kamath shares a life hack for struggling entrepreneurs
Work Policy: सर्वात मोठ्या कंपनीने वर्क पॉलिसीत केला बदल; कर्मचाऱ्यांना रविवारीही करावे लागणार काम?

निखिल कामत यांनी युवा उद्योजकांना नवीन गोष्टींचा विचार करून जग बदलण्यासाठी प्रोत्साहित केले. डब्लूटी फंड सारख्या फंडामुळे तरुण व्यावसायिकांना पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या फंडामुळे नवीन व्यावसायिक यशस्वी होऊ शकतील असे वातावरण निर्माण करेल. WTFund 40 उद्योजकांची निवड करेल आणि त्यांना निधी आणि सल्ला देण्याचे काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.