Tax Evasion: सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी केली 10,000 कोटींची करचोरी; काय आहे प्रकरण?

Online Sellers Tax Evasion : तीन वर्षांत सुमारे 10,000 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली आहे.
I-T Department Uncovers rs 10,000 crore Tax Fraud By Sellers On Facebook, Insta
I-T Department Uncovers rs 10,000 crore Tax Fraud By Sellers On Facebook, Insta Sakal
Updated on

Online Sellers Tax Evasion : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या करचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. तीन वर्षांत सुमारे 10,000 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली आहे. आयकर विभागाने 45 कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. आणखी अनेक कंपन्यांना नोटिसा पाठवल्या जातील. अहवालानुसार हे ब्रँड कर भरत नव्हते किंवा कमी कर भरत होते. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

10,000 कोटी रुपयांची करचोरी

"मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांव्यतिरिक्त, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील स्टोअर्सवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने The Economic Timesला सांगितले.

I-T Department Uncovers rs 10,000 crore Tax Fraud By Sellers On Facebook, Insta
Sam Altman: अखेर कंपनी बोर्ड झुकलं, 'Open AI'मध्ये परतणार सॅम अल्टमन; दुसरे फाउंडरही पुन्हा रुजू

अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही अशा सुमारे 45 कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत आणखी काहींना नोटिसा पाठवणार आहोत.' ते म्हणाले की यापैकी कोणतीही मोठी ई-कॉमर्स कंपनी नाही. या 45 पैकी 17 कंपन्या कपडे विकणाऱ्या आहेत. 11 दागिने विकणाऱ्या कंपन्या आहेत. 6 शूज आणि पिशव्या विकणाऱ्या कंपन्या आहेत.

5 स्थानिक फॅशन उत्पादने विकणाऱ्या कंपन्या आहेत. तर, 4 घराची सजावट आणि फर्निशिंग विकणाऱ्या कंपन्या आहेत. या यादीमध्ये काही आघाडीच्या किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे, जे मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. यातील अनेक विक्रेते आपली उत्पादने परदेशातही पाठवत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

I-T Department Uncovers rs 10,000 crore Tax Fraud By Sellers On Facebook, Insta
Tata Tech IPO: 20 वर्षानंतर आला टाटांचा IPO, खरेदीसाठी तुटून पडले लोक, तासाभरात...

कोविडनंतर बाजारात तेजी

भारतात 22.95 कोटींहून अधिक सक्रिय इंस्टाग्राम वापरकर्ते आहेत. देशात 31.40 कोटी फेसबुक वापरकर्ते आहेत. कोविडनंतर, या प्लॅटफॉर्मद्वारे वस्तू विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या 45 कंपन्यांची उलाढाल चांगली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.