ICICI Bank Warns Customer of SMS Fraud: वाढत्या डिजिटलायझेशनमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक सायबर घोटाळेबाज एसएमएसद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेने ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस फसवणुकीविरोधात इशारा दिला आहे. फसवणूक करणारे एसएमएसद्वारे बनावट संदेश पाठवून ग्राहकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. यासाठी ते फेक लिंक्स पाठवून तुमच्या फोनचा सर्व महत्त्वाचा डेटा चोरतात.
हॅकर्सना हा सर्व डेटा मिळतो आणि ते त्याचा गैरवापर करतात. अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, ICICI बँकेने इशारा जारी केला आहे.