ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

ICICI Bank: आता परदेशात राहणारे लोक देखील UPI पेमेंट वापरू शकणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही परदेशात काम करत असाल आणि तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
ICICI Bank to let NRIs use international numbers for UPI in India
ICICI Bank to let NRIs use international numbers for UPI in India Sakal
Updated on

ICICI Bank: आता परदेशात राहणारे लोक देखील UPI पेमेंट वापरू शकणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही परदेशात काम करत असाल आणि तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NPCI ने पेमेंट पद्धत 10 देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी सुरू केली आहे. याद्वारे आता भारतातील अनिवासी बाहेर राहूनही आंतरराष्ट्रीय ऑनलाइन UPI ​​पेमेंट वापरू शकतील.

ICICI बँकेने आज जाहीर केले की त्यांनी NRI ग्राहकांना त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर वापरून भारतात त्वरित UPI पेमेंट करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे दैनंदिन पेमेंट सुलभ होणार आहेत.

या सुविधेसह, बँकेचे अनिवासी भारतीय ग्राहक त्यांची युटिलिटी बिले, व्यापारी आणि ई- कॉमर्स व्यवहारांसाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकासह भारतातील ICICI बँकेत असलेल्या त्यांच्या NRE/NRO बँक खात्यात नोंदणीकृत असलेले पेमेंट करू शकतात.

ICICI Bank to let NRIs use international numbers for UPI in India
Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

बँकेने ही सेवा आपल्या मोबाईल बँकिंग अॅप iMobile Pay द्वारे उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी, अनिवासी भारतीयांना यूपीआय पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँकांमध्ये भारतीय मोबाइल नंबरची नोंदणी करावी लागत होती.

आपल्या ग्राहकांना ही सुविधा देण्यासाठी ICICI बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे देशभरात UPI च्या सोयीस्कर वापरासाठी तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांचा लाभ घेतला आहे. यूएसए, यूके, यूएई, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया या 10 देशांमध्ये बॅँक ही सुविधा देते.

बँकेचे अनिवासी भारतीय ग्राहक कोणताही भारतीय QR कोड स्कॅन करून, UPI ID किंवा कोणत्याही भारतीय मोबाइल नंबरवर किंवा भारतीय बँक खात्यावर पैसे पाठवून UPI पेमेंट करू शकतात.

ICICI Bank to let NRIs use international numbers for UPI in India
Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

iMobile Pay वापरून आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवर UPI सुविधा सक्रिय करण्यासाठी काय कराल?

स्टेप 1: iMobile Pay अॅपमध्ये लॉग इन करा

स्टेप 2: 'UPI पेमेंट्स' वर क्लिक करा

स्टेप 3: मोबाईल नंबर व्हेरिफाय करा

स्टेप 4: मॅनेज वर क्लिक करून माय प्रोफाईल मध्ये जा

स्टेप 5: नवीन UPI आयडी तयार करा (सुचवलेल्या पर्यायांमधून निवडा)

स्टेप 6: खाते क्रमांक निवडा आणि सबमिट करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.