Adani Group
Adani GroupSakal

Adani Group: अबुधाबीच्या 'या' कंपनीने अदानी समूहात केली गुंतवणूक, अगोदर विकला होता 2 कंपन्यांमधील हिस्सा

Adani Group Stocks: यापूर्वी कंपनीने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमधील आपला हिस्सा विकला होता.
Published on

Adani Group Stocks: इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी एंटरप्रायझेसमधील आपला हिस्सा 5 टक्क्यांहून अधिक वाढवला आहे. यापूर्वी आयएचसीने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमधील आपला हिस्सा विकला होता. IHC ने 3 ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 3 ऑक्टोबर रोजी 1.11 टक्क्यांनी घसरले आणि 2,387.10 रुपयांवर बंद झाले.

अबू धाबी स्टॉक एक्सचेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने म्हटले आहे की अदानी एंटरप्रायझेस विविध क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवत आहे. इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने सांगितले की त्यांनी अदानी एंटरप्रायझेसमधील आपला हिस्सा पाच टक्क्यांहून अधिक वाढवला आहे.

इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीचे म्हणणे आहे की अदानी एंटरप्रायझेस अंतर्गत विकसित होत असलेले विमानतळ, डेटा सेंटर्स, ग्रीन हायड्रोजन आणि इतर व्यवसायांच्या विकासाची भरपूर क्षमता आहे.

अदानी एंटरप्रायझेस भारताच्या वाढीचा पुरेपूर फायदा घेण्यास तयार आहे. इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने म्हटले आहे की IHC भागधारकांना जास्तीत जास्त परतावा देण्याच्या उद्देशाने भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे.

Adani Group
Penalty on LIC: आयकर विभागाने LICला ठोठावला 84 कोटी रुपयांचा दंड, काय आहे कारण?

गेल्या आठवड्यात इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स या दोन कंपन्यांमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता.

अदानी ग्रुपच्या दोन्ही कंपन्यांमध्ये आयएचसीची एक टक्क्यांहून अधिक भागीदारी होती. दोन्ही कंपन्यांमध्ये इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीच्या होल्डिंगचे मूल्य 3,327 कोटी रुपये होते.

Adani Group
Meta Layoffs: मार्क झुकरबर्गच्या कंपनीत होणार कर्मचारी कपात, 600 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

आधी हिंडेनबर्ग आणि नंतर OCCRP ने अदानींच्या कंपन्यांबद्दल नकारात्मक अहवाल जारी केला होता. अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते.

आरोपांमुळे अदानी समुहाच्या शेअर्सचे नुकसान झाले असले तरी, GQG सारख्या कंपन्यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, तर आता अबू धाबीच्या आघाडीच्या इन्व्हेस्टर होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी समूहाच्या प्रमुख कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.