Cattle Trading: आयआयटी दिल्लीच्या मुलींनी जनावरे खरेदीसाठी लाँच केलं अ‍ॅप; होतेय कोट्यावधींची कमाई

संपूर्ण भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची स्थापना केली.
IIT Delhi roommates launch cattle trading platform, revenue jumps to 565 Crore
IIT Delhi roommates launch cattle trading platform, revenue jumps to 565 CroreSakal
Updated on

Cattle Trading: आयआयटी दिल्लीच्या दोन मुलींनी जनावरे खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म, 'अ‍ॅनिमॉल' अ‍ॅप सुरू केले आहे. त्यातून त्या कोट्यावधींची कमाई करत आहेत. FY22 साठी या प्लॅटफॉर्मची कमाई 7.4 कोटी होती आणि ती आता 565 कोटी इतकी वाढली आहे, स्टार्टअप पीडियाने ही माहिती दिली.

आयआयटी-दिल्लीमधून पदवी घेत असताना नीतू यादव आणि कीर्ती जांगरा यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. संपूर्ण भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, Animal हा प्रकल्प म्हणून ऑगस्ट 2019 गुरुग्राममध्ये हा उद्योग सुरू झाला.

नीतू आणि कीर्ती यांनी हजारो शेतकऱ्यांशी बोलून आणि भारतातील गुरांचा बाजार अत्यंत असंघटीत आहे हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. (IIT Delhi roommates launch cattle trading platform, revenue jumps to 565 Crore)

"ग्रामीण भारतासाठी दुग्धव्यवसाय हा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा आहे आणि आम्हाला तो आणखी मोठा करायचा आहे," असे नीतू यादव म्हणतात.

लिंक्डइन पोस्टनुसार, बेंगळुरू-आधारित स्टार्टअपची स्थापना 2019 मध्ये झाली आहे. Animall चे संस्थापक अनुराग बिसोय, कीर्ती जांगरा, लिबिन व्ही बाबू आणि नीतू यादव यांनी मिळून हा व्यवसाय सुरु केला.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जनवरांची खरेदी विक्रीचा व्यापार आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ तयार केले आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म जनावरांना आरोग्य सेवा देखील पुरवते.

IIT Delhi roommates launch cattle trading platform, revenue jumps to 565 Crore
Adani Group: अदानी ग्रुपच्या कॉर्पोरेट प्रमुखांचा NDTVच्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा; कारण...

कंपनीने FY22 मध्ये गुरांच्या व्यापारातून 90% कमाई केली. उर्वरित 10% आरोग्यसेवा, कृत्रिम गर्भाधान आणि मार्केटप्लेस कमिशनमधून कमाई केली आहे.

कंपनीने वर्ष 22 मध्ये 3.94 कोटीचे उत्पन्न देखील मिळवले, ज्यामुळे त्यांचे एकूण उत्पन्न 11.34 कोटी झाले. स्टार्टअपला विक्री आणि वितरणासाठी 18.04 कोटी खर्च आला, जो FY22 मध्ये त्याच्या एकूण खर्चाच्या 32.5% इतका होता.

Beenext, Sequoia, Nexus Ventures सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून सुमारे 170 कोटी निधी उभारण्यात Animall यशस्वी झाले आहे.

IIT Delhi roommates launch cattle trading platform, revenue jumps to 565 Crore
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.