Income Certificate : उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार; संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य
Income certificate to given after five years Sanjay Gandhi Shravanbal Yojana condition relaxed
Income certificate to given after five years Sanjay Gandhi Shravanbal Yojana condition relaxed sakal
Updated on

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे, यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास अडचणी येत असल्याने दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता ५ वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे . तशा प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

Income certificate to given after five years Sanjay Gandhi Shravanbal Yojana condition relaxed
Income Tax: 'या' ६ उत्पन्न स्त्रोतातून कमावलेल्या कमाईवर इन्कम टॅक्सच नाही! काय आहेत नियम?

जवळपास ४१ लाखजण या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.