RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Income Source of RBI: भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी सरकारी तिजोरीत भरीव योगदान देते. हा पैसा सरकारला RBI कडून लाभांशाच्या रूपात मिळतो. मोठा लाभांश देण्यासाठी, चांगली कमाई देखील आवश्यक आहे. पण हा पैसा येतो कसा?
Income Source of RBI how reserve bank makes money and earns in lakh crores
Income Source of RBI how reserve bank makes money and earns in lakh crores Sakal
Updated on

Income Source of RBI: भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी सरकारी तिजोरीत भरीव योगदान देते. हा पैसा सरकारला RBI कडून लाभांशाच्या रूपात मिळतो. मोठा लाभांश देण्यासाठी, चांगली कमाई देखील आवश्यक आहे. पण हा पैसा येतो कसा? अलीकडेच युनियन बँक ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणाऱ्या लाभांशावर आपला अंदाज व्यक्त केला होता.

या महिन्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार रिझर्व्ह बँक या वर्षी लाभांशाद्वारे सरकारी तिजोरीत 1 लाख कोटी रुपयांचे योगदान देऊ शकते. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 87 हजार 400 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले होते.

रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, 2023 मध्ये भारताच्या बँकिंग नियामकाने एकूण 2.3 लाख कोटी रुपयांची कमाई केली होती. हा आकडा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या 5 टक्क्यांहून अधिक आहे.

Income Source of RBI how reserve bank makes money and earns in lakh crores
Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

आता प्रश्न असा पडतो की रिझर्व्ह बँकेला एवढा पैसा कसा मिळतो? हे रिझर्व्ह बँकेच्या कामावरून समजू शकते. रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. भारताच्या बँकिंग प्रणालीचे नियमन करणे हे त्याचे काम आहे. याशिवाय चलन म्हणजेच भारतीय रुपया छापणे, त्याचा बाजारात पुरवठा करणे, रुपयाचा पुरवठा आणि त्याची किंमत नियंत्रित करणे इत्यादी कामेही रिझर्व्ह बँकेचीच आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा एक स्रोत म्हणजे चलन छपाईतून मिळणारा नफा. त्या चलनाचे मूल्य हे चलन छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेला जेवढे खर्च करावे लागते त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणजे, छपाईच्या खर्चात जितके जास्त मूल्य जोडले जाईल तितका नफा जास्त. याशिवाय आरबीआय विविध व्यावसायिक बँकांना कर्ज देते. त्या बदल्यात बँका आरबीआयला व्याज देतात. सरकारी रोख्यांच्या खरेदी-विक्रीतूनही रिझर्व्ह बँक कमाई करते. रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये परकीय मालमत्तांचा समावेश होतो, ज्यातून उत्पन्न मिळते.

Income Source of RBI how reserve bank makes money and earns in lakh crores
Gold Price Today: चांदी विक्रमी उच्चांकावर; सोनेही चमकले, काय आहे आजचा भाव?

सर्वात जास्त उत्पन्न येथून मिळते

रिझर्व्ह बँकेचे मुख्य उत्पन्न हे व्याज आणि परकीय चलनातून असल्याचे युनियन बँकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदातील सुमारे 70 टक्के रक्कम विदेशी चलन संपत्तीच्या स्वरूपात आहे, तर 20 टक्के सरकारी रोख्यांच्या स्वरूपात आहे. या सिक्युरिटीजमधून रिझर्व्ह बँकेचे व्याज उत्पन्न 1.5 लाख कोटी ते 1.7 लाख कोटी रुपये असू शकते, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.