Income Tax Notice: आयकर विभागाच्या नोटीशीमुळे करदाते चिंतेत, तुमच्याकडून ही चूक तर झाली नाही ना?

Income Tax Notice: आयकर विभाग देशातील हजारो लोकांना नोटीस पाठवत आहे.
Income Tax Notice
Income Tax NoticeSakal
Updated on

Income Tax Notice: आयकर विभाग देशाच्या विविध भागात हजारो लोकांना नोटीस पाठवत आहे. एका अहवालानुसार, प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातच्या करदात्यांना कलम 143(1) अंतर्गत कर नोटीस पाठवून कलम 80P अंतर्गत कपातीचा दावा का केला आहे, अशी विचारणा केली आहे.

याचे उत्तर 15 दिवसांत करदात्यांना द्यावे लागणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. उत्तर न दिल्यास करदात्यांना पुन्हा नोटीस मिळू शकते.

Income Tax Notice
Shaktikanta Das: शक्तीकांत दास जगातील 3 सर्वोत्कृष्ट बँकर्सपैकी एक, पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

असे सांगण्यात आले आहे की या अंतर्गत फक्त सहकारी संस्था 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात, परंतु ही कपात तेव्हाच केली जाईल जेव्हा ते बँकिंग किंवा क्रेडिट सुविधा आणि कृषी उद्योगांमधून कमाई करत असतील.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, अहमदाबादमधील चार्टर्ड अकाउंटंट राजू शाह यांनी सांगितले की कलम 80P कपातीचा दावा करण्यासाठी कलम 143(1)(a) अंतर्गत चुकीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत.

या नोटीसा सहकारी बँकांना पाठवल्या जात नाहीत, तर व्यक्तींना पाठवल्या जात आहेत. तर सहकारी बँकांकडून हा दावा करण्यात येत आहे.

Income Tax Notice
Jet Airways: ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी ते जेट एअरवेजचे मालक, नरेश गोयल असे अडकले ईडीच्या जाळ्यात

वैयक्तिक करदाते दावा करू शकत नाहीत

ई-मेल केलेल्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की कलम 80P अंतर्गत वजावटीवर मूल्यांकन वर्ष 2023-23 साठी दावा केला जाऊ शकत नाही आणि त्यांनी संबंधित करदात्यांना 15 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात माहिती दिली होती की, प्राप्तिकर विभागाने एक लाखाहून अधिक करदात्यांना प्राप्तिकर नोटिसा जारी केल्या होत्या. आयटीआर न भरल्याने आणि उत्पन्नाची चुकीची माहिती दिल्याने या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

ज्यांचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना या नोटिसा पाठवण्यात आल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.