Tax Exemption Limit on Gratuity: 'ग्रॅच्युइटी'बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता 'इतक्या' रकमेपर्यंत टॅक्स फ्री

Tax Exemption Limit on Gratuity: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकानरने कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
income tax exemption on gratuity extended to 25 lakhs by modi govt cabinet Marathi news
income tax exemption on gratuity extended to 25 lakhs by modi govt cabinet Marathi news
Updated on

Tax Exemption Limit on Gratuity Extended : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकानरने कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने ग्रॅच्युइटीसाठीची टॅक्स मर्यादा वाढवून २५ लाख रुपये केली आहे. आता या रकमेपर्यंत ग्रॅच्युइटी झाल्यास त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाहीये. ही मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती.

सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स (CBDT)ने ८ मार्च २०१९ च्या नोटीफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी लिमिट १० लाखांहून वाढवून २० लाख करण्यात आलं होतं.

याशिवाय केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महागाई भत्ता देखील वाढवण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली आङे. केंद्रीय कॅबिनेटने महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळेल. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.

मार्च अखेर पगारासोबत तो क्रेडिट केला जाईल. एकूण दोन महिन्याचा एरियर (arrears) देखील यामध्ये देण्यात येईल. लागोपाठ चार वेळा महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्याने सरकारी तिजोरीवर १२,८६८.७२ रुपयांचा भार वाढणार आहे.

income tax exemption on gratuity extended to 25 lakhs by modi govt cabinet Marathi news
Rohit Pawar : 'बारामती अ‍ॅग्रो' प्रकरणी रोहित पवारांचा कारखाना 'ईडी'कडून जप्त

जानेवारी २०२४ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के डीए मिळणार आहे. मात्र यानंतर महागाई भत्ता शून्य करण्यात येईल. त्यानंतर महागाई भत्त्याची मोजणी ही शून्यापासून शुरू केली जाईल. तसेच ५० टक्के डीए हा कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये देण्यात येईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची पे-बँडनुसार किमान बेसीक सॅलरी १८००० असेल तर त्याच्या ५० टक्के म्हणजेच ९००० रुपये पगारात देण्यात येतील.

income tax exemption on gratuity extended to 25 lakhs by modi govt cabinet Marathi news
Ramayan Movie Update: रणबीरच्या 'रामायण' चित्रपटाविषयी आली मोठी अपडेट एक दोन नव्हे तर तब्बल....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.