Income Tax Changes: आयकर नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने प्रत्यक्ष कर नियम सुलभ करण्यासाठी एक पॅनेल तयार केले आहे. पॅनेलच्या सूचनांच्या आधारे अनेक नियम रद्द केले जाऊ शकतात. बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आयकर कायदा 1961च्या 90 पेक्षा जास्त कलमे अप्रासंगिक आहेत, असे पॅनेलचे मत आहे.