IT Raid: मोठी बातमी! आयकर विभागाने 'या' बँकांवर केली मोठी कारवाई, छाप्यात...

आयकर विभागाने सहकारी बँकांवर छापे टाकले आहेत.
IT Raid
IT RaidSakal
Updated on

IT Raid on Co-operative Bank: आयकर विभागाने कर्नाटकातील काही बँकांवर मोठी कारवाई करताना 1,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खुलासा केला आहे. आयकर विभागाने कर्नाटकातील सहकारी बँकांवर छापे टाकले आहेत (IT Raid on Cooperative Banks).

या छाप्यात आयकर विभागाला कथित अनियमितता आढळून आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मंगळवारी याबाबत खुलासा केला आहे. पुढील महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि सर्व राजकीय पक्ष तेथे प्रचारात व्यस्त आहेत.

सहकारी बँका कर चुकवत होत्या :

या छाप्याबाबत माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले की, प्राप्तिकर विभागाने अनेक सहकारी बँकांची तपासणी केली आहे. ही तपासणी 31 मार्च 2023 रोजी सुरू झाली.

आयकर विभागाला संशय आला की, या बँका त्यांच्या ग्राहकांच्या विविध व्यवसायातून पैसे वळवत आहेत जेणेकरून त्यांचा कर वाचू शकेल. या झडतीदरम्यान आयकर विभागाने 3.3 कोटी रुपयांहून अधिक रोख आणि 2 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे दागिनेही जप्त केले आहेत.

IT Raid
Adani Group: फायनान्शियल टाइम्सच्या लेखावर अदानी समूहाचे स्पष्टीकरण; म्हणाले, पत्रकारांनी...

बँकांनी केवायसी नियमांचे पालन केले नाही :

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या नावाने सहकारी बँका त्यांच्या ग्राहकांशी संबंधित लोकांचे पैसे जसे की रिअल इस्टेट कंपन्या, कंत्राटदार इत्यादींचे पैसे KYC प्रक्रियेशिवाय वळवतात, असे पुराव्यांवरून आढळून आले आहे.

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच ते पैशाचे व्यवहार करत होते. आयकर विभागाने केलेल्या तपासणीत सहकारी बँकेच्या या खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम नंतर खात्यातून काढण्यात आल्याचे आढळून आले आहे.

यासाठी बँकेने ग्राहकांच्या पैशांचा खरा स्रोत लपविण्याचा प्रयत्न केला आहे. आरबीआयच्या नियमांनुसार सर्व ग्राहकांचे केवायसी पूर्ण करणे ही बँकांची जबाबदारी आहे.

IT Raid
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.