Income Tax Return: गृहिणींनी इन्कम टॅक्स भरायचा का? ही गोष्ट तुम्हाला माहिती हवीच!

गृहिणी आपले नियमित उत्पन्न नसल्याचा विचार करून आयकर विवरणपत्र भरत नाही.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal
Updated on

Income Tax Return Filing 2023: तुम्ही कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नसला तरीही, तुम्ही आयकर विवरणपत्र भरले पाहिजे. हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमचा थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यातून तुम्हाला मिळणारे फायदे जाणून तुम्हाला धक्का बसेल. चला जाणून घेऊया बेरोजगार आणि गृहिणींनी रिटर्न का भरावा?

31 जुलै ही रिटर्न भरण्याची अंतिम मुदत

आयकर रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने यासाठी 31 जुलै 2023 ही तारीख निश्चित केली आहे. ही मुदत आणखी वाढवण्याची शक्यता नाही आणि महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, 31 जुलैच्या पुढे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आणखी वाढविण्याचा अर्थ मंत्रालय विचार करत नाही.

सहसा गृहिणी आपले नियमित उत्पन्न नसल्याचा विचार करून आयकर विवरणपत्र भरत नाही. खरं तर आजच्या काळात कर्ज घेण्यापासून ते व्हिसा मिळवण्यापर्यंत ही कागदपत्रे महत्त्वाची मानली जातात आणि त्याची गरजही आहे.

गृहिणी Nil आयटीआर भरू शकतात

जे कोणीही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत किंवा गृहिणी आहेत त्यांनी Nil ITR किंवा zero ITR भरावा. हे असे आयकर रिटर्न आहे, ज्यामध्ये कोणतेही कर दायित्व नाही. म्हणजे तुमच्यावर कोणताही कर लावला जात नाही, तरीही तुम्ही ITR भरत आहात तर त्याला Nil ITR म्हणतात.

याद्वारे तुम्हाला अनेक सुविधा मिळतात, जसे की आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावे लागले तर ते मिळू शकते.

पहिला फायदा: कर्ज घेणे सोपे

नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत किंवा गृहिणी आहेत त्यांना टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक असू शकत नाही, परंतु जर एखादी गृहिणी आयटीआर भरत असेल तर तिला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

फायद्यांबद्दल बोलायचे तर ज्या गृहिणींचे उत्पन्न शून्य आहे आणि त्यांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यांना कर्जाची गरज भासत असेल तर अशा परिस्थितीत टॅक्स रिटर्न भरणाऱ्या महिलांसाठी बँका कर्ज सहज मंजूर करतात.

दुसरा फायदा: व्हिसा मिळविण्यासाठी उपयुक्त

तुम्ही कोणत्याही उत्पन्नाशिवाय दरवर्षी निल आयटीआर फाइल केल्यास तुमच्यासाठी व्हिसा मिळणे सोपे होऊ शकते. व्हिसासाठी अर्ज करताना 3 वर्षांसाठी आयटीआर भरल्याच्या कागदपत्रांची मागणी केली जाते.

याद्वारे विभागाला कळते की ज्या अर्जदाराने अर्ज केला आहे तो प्रत्येक कायद्याचे पालन करतो आणि प्रवासादरम्यान आणि परत येईपर्यंत त्याच्याकडे पुरेसे आर्थिक स्रोत आहेत. येथे आयटीआर सबमिट करणे पर्यायी असू शकते परंतु व्हिसा मिळण्यास नक्कीच मदत होते.

Income Tax Return
Income Tax Return: दंडापासून तुरुंगापर्यंत... मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही, तर होऊ शकते मोठे नुकसान

तिसरा फायदा: मालमत्ता विक्री किंवा गुंतवणूक

गृहिणींसाठी शून्य ITR भरण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा त्या त्यांच्या स्वतःच्या नावावर नोंदणीकृत मालमत्ता म्हणजेच जमीन किंवा घर विकतात.

किंवा स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. मालमत्तेच्या विक्रीदरम्यान भांडवली नफ्यावर किंवा स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीवरील उत्पन्नावर कर आकारला जातो. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी आयटीआर भरणे आवश्यक आहे.

बचत योजना, शेअर मार्केट गुंतवणुकीत केलेल्या गुंतवणुकीत वाढ झाल्यास, आयकर विभागाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार तुम्हाला आयटीआरद्वारे कर लाभ मिळू शकतात. याशिवाय, आयकराच्या कक्षेत येत नसले तरी, तुमच्या बँक ठेवींवर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नावर मिळालेल्या व्याजावर कापलेला टीडीएस परत मिळण्यास मदत होते.

Income Tax Return
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.