Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय पण रिफंड मिळालेला नाही? असा तपासा ऑनलाईन स्टेटस

Income Tax Return: CBDT कडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 लाख करदात्यांना रिफंड पाठवण्यात आला आहे.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal
Updated on

How to check IT refund status online: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आत्तापर्यंत कर भरला नसेल तर लवकर भरा.

ज्यांनी वेळेवर आयटीआर भरला आहे त्यांना आयकर विभाग रिफंड पाठवत आहे. CBDT कडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 लाख करदात्यांना रिफंड पाठवण्यात आला आहे.

आयकर विभाग आयटीआर दाखल केल्यानंतर 15-20 दिवसांच्या आत करदात्यांना रिफंड पाठवतात. जर तुम्ही आयकर रिटर्न भरले असेल परंतु तुम्हाला रिफंड मिळाला नसेल, तर तुम्ही त्याची स्थिती तपासू शकता.

याप्रमाणे तुम्ही रिफंड स्टेटस तपासा

  • सर्वप्रथम तुम्हाला tin.tin.nsdl.com वर जावे लागेल.

  • रिफंड स्टेटस तपासण्यासाठी येथे दोन तपशील देणे आवश्यक आहे - पॅन क्रमांक आणि ज्या वर्षाचा रिफंड बाकी आहे ते वर्ष.

  • आता खाली दिलेला कॅप्चा कोड टाका.

  • यानंतर, तुम्ही Proceed वर क्लिक करताच तुमच्या रिफंडचा स्टेटस दिसेल.

Income Tax Return
Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

यामुळे रिफंड मिळणार नाही

जर तुम्हाला ITR दाखल करून 15-20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील आणि तुमच्या खात्यात रिफंड आला नसेल, तर याची अनेक कारणे असू शकतात.

जर तुमच्या बँक खात्याचा तपशील बरोबर दिला नसेल तर तुम्हाला रिफंड मिळण्यात समस्या येऊ शकतात. त्याच वेळी, तुमचे बँक खाते वैध नसले तरीही, तुम्हाला रिफंड मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Income Tax Return
Lottery Ticket: बाईपण भारी देवा! 11 जणींनी 25 रुपये गोळा करुन काढली लॉटरी, लागला 10 कोटींचा जॅकपॉट

याशिवाय, जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरला असेल, पण ITR पडताळणी केली नसेल, तर तुम्हाला रिफंड मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही पडताळणी करेपर्यंत तुमच्या रिटर्नवर आयकर विभाग प्रक्रिया करणार नाही.

Income Tax Return
UPI Payment : रूपे क्रेडिट कार्डाद्वारे येस बँकेची यूपीआय सुविधा

नोंद: आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.