Income Tax Rules : घरात 'या' लिमिटपर्यंतच ठेऊ शकता कॅश, नाहीतर होऊ शकते कारवाई

तुम्हीही तुमच्या घरी काही ना काही कॅश नक्की ठेवत असाल पण तुम्हाला घरी कॅश ठेवायची लिमिट माहिती आहे का?
Income Tax Rules
Income Tax Rules sakal
Updated on

Income Tax : बरेच लोक गरजेपेक्षा जास्त कॅश घरी ठेवतात कारण वेळ आली तर बँकेतून किंवा एटीएममधून तात्काळ पैसे काढणे अशक्य असते. तुम्हीही तुमच्या घरी काही ना काही कॅश नक्की ठेवत असाल पण तुम्हाला घरी कॅश ठेवायची लिमिट माहिती आहे का?

जर तुम्ही लिमिटच्या बाहेर कॅश घरी ठेवत असाल तर इनकम टॅक्स विभाग तुमच्यावर कारवाईही करू शकते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Income Tax Rules you have to keep cash limit at home)

मुळात घरी किती पैसे ठेवायचे याची कोणतीही लिमिट दिलेली नाही पण इनकम टैक्स (Income Tax) नियमांच्या मते तुम्ही तुमच्या घरी कितीही पैसे ठेवू शकता. मात्र जर हे पैसे किंवा कॅश तपासणी करणाऱ्या एजेंसीच्या हाती लागले तर त्यांना या पैशांचा सोर्स सांगावा लागतो.

जर तुम्ही वैध प्रकारे पैसे कमावले असेल तर त्याचे संपुर्ण डॉक्यूमेंट्स किंवा इनकम टैक्स रिटर्न भरला असेल तर घाबरायचं कारण नाही पण जर तुम्ही सोर्स सांगितला नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Income Tax Rules
Income Tax : 'या' राज्यात आयकर कायदा लागू नाही, करोडोंच्या उत्पन्नावरही नाही कर; वाचा काय आहे कारण

जर तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कॅशचा हिशोब देत नसाल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. जर इनकम टॅक्स विभागाने तुमच्या घरी छापा मारला आणि मोठ्या संख्येने कॅश मिळाली अन् तुम्ही कॅश विषयी योग्य ती माहिती देऊ शकले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

तुमच्याजवळ जितकी कॅश असेल ती सर्व जमा केले जाईल सोबतच त्या अमाउंटचा ३७% पर्यंत टॅक्स लावला जाणार. याचा अर्थ की तुम्ही तुमची कॅशची रक्कमही गमवाल आणि त्यावर ३७ टक्के टॅक्सही लावला जाणार.

Income Tax Rules
Income Tax : '८०पी प्रमाणे आयकर माफी द्यावी' - काका कोयटे

बँकेत एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तर आपल्याला पॅन कार्ड दाखवावं लागेल. खरेदी करताना 2 लाखांपेक्षा जास्त पेमेंट करू शकत नाही. यासाठी तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार कार्ड दाखवावं लागेल.

एका वर्षात तुम्हाला बँक अकाउंटमध्ये 20 लाखापेक्षा जास्त कॅश डिपॉजिट करायचा असेल तर तुम्हाला पॅन आणि आधार कार्ड बँकमध्ये दाखवावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()