Real Estate: सणासुदीच्या काळात घरांच्या मागणीत वाढ; गेल्या नऊ महिन्यांत पुण्यात 1,07,445 घरांची विक्री

Real Estate Demand: पुण्यात घर घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून घरांच्या विक्रीचा नवीन उच्चांक गाठला जात आहे.
Increase in housing demand during festive season; 1,07,445 houses sold in Pune in last nine months write jatin suratwala
Increase in housing demand during festive season; 1,07,445 houses sold in Pune in last nine months write jatin suratwala Sakal
Updated on

: जतीन सुरतवाला

Real Estate Demand In Pune: पायाभूत सुविधांसह चांगले शिक्षण घेण्याच्या सुविधा, रोजगारासाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि झपाट्याने वाढत असलेले माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल आणि स्टार्टअपचे क्षेत्र. यामुळे पुण्यात स्थायिक होण्यासाठी असलेली पसंती वर्षागणिक वाढत आहे. वाढत्या नागरिकीकरणाच्या गरजा पुरवण्यासाठी या शहरात गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल झाले आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ.

अद्ययावत तंत्रज्ञान, बांधकामासाठी उपलब्ध असलेले पुरेशी लँड बँक, बांधकाम क्षेत्राला मिळणारा प्रतिसाद यामुळे पुण्यातील बांधकाम क्षेत्राची देशात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुण्यात घर घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून घरांच्या विक्रीचा नवीन उच्चांक गाठला जात आहे.

यावर्षी देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस पुण्यात 1,07,445 सदनिकांची विक्री झाली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातील मालमत्तेच्या नोंदणीमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जिल्ह्यात 9,942 सदनिकांची विक्री झाल्याची नोंद झाली होती.

सप्टेंबर 2023 मध्ये हा आकडा 16,422 युनिट्सवर पोहोचला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात नोंदणीकृत मालमत्तांचे एकत्रित मूल्य 12,286 कोटी रुपये आहे. या सर्व आकडेवारीचा विचार करता आगामी सणांच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुण्यात झालेल्या घरांच्या खरेदीचा चढता क्रम लक्षात घेता यंदाच्या शेवटच्या तिमाहीत घर खरेदीचा नवा उच्चांक प्रस्थापित होईल, अशा विश्वास आहे.

महागड्या घरांना असलेली मागणी वाढली :

25 ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या सदनिकांची सप्टेंबर 2023 मध्ये सर्वाधिक मागणी होती. ज्यात सर्व गृहनिर्माण व्यवहाराच्या 34.4 टक्के समावेश होता. तर 50 लाख आणि 1 कोटी रुपये दरम्यान किंमत असलेल्या मालमत्तेचा वाटा 33.6 टक्के होता.

विशेष म्हणजे, 1 कोटी रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या सदनिकांची मागणी यंदा देखील वाढलेली आहे. या बजेटचा सप्टेंबर 2022 मधील एकूण विक्रीत 9 टक्के वाटा होता. सप्टेंबर 2023 मध्ये त्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये 2.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये 97 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

आगामी काळात घरांची मागणी वाढणार असल्याची कारणे:

१) मुहूर्त: नवरात्री, दसरा, दिवाळी असे अनेक मुहूर्त आगामी काळात आहेत. या मुहूर्तांच्या निमित्ताने नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढत असते. या सणांच्या निमित्ताने घर खरेदीला देखील प्राधान्य असते. त्याच्यामुळे आगामी काळात घरांची मागणी वाढविण्यामागे मुहूर्त हा महत्त्वाचा घटक आहे.

२) ऑफर्स: खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सनावळीच्या काळात विविध ऑफर जाहीर केल्या जातात. बांधकाम क्षेत्र याला अपवाद नाही. आगामी सणांचा विचार करता काही बांधकाम व्यावसायिकांनी आत्तापासूनच अनेक आकर्षक ऑफर घर खरेदीदारांसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून घर खरेदीचा आकडा वाढतो.

Increase in housing demand during festive season; 1,07,445 houses sold in Pune in last nine months write jatin suratwala
RBI रेपो रेटच्या निर्णयानंतर गृहखरेदीवर कसा होणार परिणाम? काय म्हणतात तज्ज्ञ?

३) पोषक वातावरण: घर खरेदीसाठी योग असावा लागतो, असे आपण सर्रास म्हणतो. या योगाला काही निमित्त देखील असतात. आपल्या आवडत्या परिसरात बजेटमध्ये घर उपलब्ध होणे, घर खरेदीसाठी लागणारे पुरेसे भांडवल उपलब्ध होणे, बँकेने लोन मंजूर करणे, त्यावर योग्य व्याजदर असणे असे अनेक मुद्दे असतात. त्यानंतरच घर खरेदी होत असते. या सर्व बाबी विचारात घेत घर खरेदीसाठी आत्ता पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा फायदा नवीन घर खरेदीदारांना निश्चितपणे होईल.

४) बँकांचा पाठिंबा: बँकांच्या अर्थसह्याचे बळ घेऊन घर खरेदीची उंच झेप घेणाऱ्यांची संख्या घर खरेदीदारांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे घर विकत घेण्याच्या प्रक्रियेत बँकांचा पाठिंबा किती आहे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सणांच्या काळात बँका ऑफर देत असतात. तसेच कर्जाचे प्रकरण जलद निकाली देखील लावली जाते. योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही दिवसांतच ग्रहकर्ज मंजूर होईल याची खबरदारी बँका घेतात. त्यामुळे या काळात बँकांचा पाठिंबा अत्यंत सकारात्मक असतो.

५) अभी नही तो कभी नही: घर आवडले आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेपैकी 90 टक्केहून अधिक रक्कम जमा झाली आहे. मात्र त्यानंतरही घर घ्यावे की नाही अशी चलबिचल अनेकांच्या मनात असते. अशी मानसिकता झालेल्या घर खरेदीदारांना या सणांच्या काळात एक सकारात्मक ऊर्जा मिळते व घरखरेदीचा अंतिम निर्णय घेण्यास मदत होते. जर आता घर घेतले नाही तर नंतर घर खरेदीला उशीर होऊ शकतो हे लक्षात घेत शक्य तितक्या लवकर करार करून घेतला जातो.

६) वाढती किंमत: घर खरेदीचा निर्णय लांबल्याने काही कालावधीनंतर घरांच्या किमती देखील वाढतात तसेच त्यावेळी देत असलेली ऑफर बांधकाम व्यवसाय पुन्हा पुढील वेळी देईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे घर खरेदीचा निर्णय लांबला तर त्याच प्रकल्पातील घरासाठी जास्त किंमत मोजावी लागले, असे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी आगामी काळात सणांच्या निमित्ताने घराची खरेदी करूच, असा निश्चय आणि अनेकांनी केला आहे.

Increase in housing demand during festive season; 1,07,445 houses sold in Pune in last nine months write jatin suratwala
RBI MPC Meeting: रिझर्व बँकेच्या धोरणामुळे सणासुदीच्या काळात घर घेणे होणार सोपे? काय सांगतात तज्ञ

वर्ष - महिना - एकूण नोंदणी – मालमत्तेचे मूल्य (कोटींत) - मुद्रांक शुल्काचे संकलन (कोटीत)

2022 – सप्टेंबर - 9,942 - 5,927 - 357

2022- ऑक्टोबर - 11,842 - 7,137 - 445

2022 – नोव्हेंबर - 13,694 - 8,627 - 517

2022 – डिसेंबर - 13,330 - 8,299 - 499

2023 – जानेवारी - 12,166 - 7,736 - 441

2023 – फेब्रुवारी -14,284 - 8,986 - 517

2023 – मार्च - 14,309 - 9,215 - 621

2023 – एप्रिल - 8,758 - 8,743 - 319

2023- मे - 8,958 - 7,709 – 283

2023 – जून - 8,913 - 7,167 - 278

2023 – जुलै - 10,614 - 8,846 - 344

2023 – ऑगस्ट - 13,021 - 10,613 - 423

2023 – सप्टेंबर - 16,422 - 12,286 - 580

(स्त्रोत: महाराष्ट्र शासन नोंदणी आणि स्टॅंप्स विभाग (आयजीआर); नाईट फ्रॅंक इंडिया)

- लेखक हे सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.