Top Construction Companies In India : भारताने केली चीनवर मात; आशियातील सर्वाधिक मूल्यांकित बांधकाम कंपन्या भारतात

रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासदराबाबत भारताने चीनला मागे टाकत आशिया खंडात आघाडी घेतल्याचे ‘ग्रोहे-हुरून’च्या अहवालात नमूद केले आहे.
Top Construction Companies In India
Top Construction Companies In IndiaSakal
Updated on

नवी दिल्ली : रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासदराबाबत भारताने चीनला मागे टाकत आशिया खंडात आघाडी घेतल्याचे ‘ग्रोहे-हुरून’च्या अहवालात नमूद केले आहे. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने प्रगती करत असून, देशातील ८६ टक्के कंपन्यांच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे. या कंपन्यांच्या मूल्यात वर्षभरात ६.२ लाख कोटींची भर पडली आहे. भारतात एक लाख कोटींहून अधिक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांची संख्या ३६ आहे.

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख १०० कंपन्यांची यादी ‘ग्रोहे हुरून’ने जारी केली. त्यानुसार दोन लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्यांकन असलेली ‘डीएलएफ’ देशातील सर्वांत मोठी बांधकाम व्यावसायिक कंपनी ठरली.

अभिषेक लोढा यांची ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ दुसऱ्या क्रमांकावर, तर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक मूल्यांकन असलेल्या बांधकाम कंपन्यांचे एकत्रित मूल्य १४.२ लाख कोटी रुपये आहे. हा आकडा ओमान व श्रीलंका यांच्या एकत्रित ‘जीडीपी’पेक्षाही अधिक आहे.

प्रमुख कंपन्यांची पसंती मुंबईला!

  • देशातील प्रमुख १० बांधकाम कंपन्यांपैकी सहा कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ दोन कंपन्या बंगळूरमध्ये, तर गुरूग्राम व अहमदाबादमध्ये एका कंपनीचे मुख्यालय आहे.

  • १०० पैकी ३३ कंपन्यांची मुख्यालये मुंबईत असून, त्यापाठोपाठ बंगळूरमध्ये १५, नवी दिल्लीत १४, गुरुग्राममध्ये १०, हैदराबादमध्ये ६, अहमदाबाद, पुणे व नोएडा येथे प्रत्येकी ४, चेन्नई व कोचीत प्रत्येकी ३ कंपन्यांची मुख्यालये आहेत.

  • राज्यनिहाय विचार केल्यास, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि हरियानात सर्वाधिक कंपन्यांची मुख्यालये आहेत.

देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक व कंपनी

नाव - कंपनी -संपत्ती (रु. कोटींमध्ये)

  • राजीव सिंह -डीएलएफ -१,२४,४२०

  • मंगलप्रभात लोढा -मॅक्रोटेक डेव्हलपर्स -९१,७००

  • गौतम अदानी -अदानी रिॲल्टी -५६,५००

  • विकास ओबेरॉय -ओबेरॉय रिॲल्टी -४४,८२०

  • चंद्रू रहेजा -के. रहेजा- ४३,७१०

  • अतुल रुईया- द फिनिक्स मिल्स- २६,३७०

टॉप १० बांधकाम कंपन्या

कंपनी - मूल्यांकन (रु. कोटींमध्ये) -वाढ

  • डीएलएफ- २,०२,१४० -७२%

  • मॅक्रोटेक डेव्हलपर्स - १,३६,७३० -१६०%

  • इंडियन हॉटेल्स- ७९,१५० - ४३%

  • गोदरेज प्रॉपर्टीज -७७,२८०- १००%

  • ओबेरॉय रिॲल्टीज -६६,२००- ९६%

  • प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट - ६३,९८०- २३०%

  • अदानी रिॲल्टी- ५६,५०० -६२%

  • द फिनिक्स मिल्स -५५,७४० -११२%

  • के. रहेजा ग्रुप -५५,३०० -६५%

  • एम्बसी ऑफिस पार्क- ३३,१५०- १४%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.