Forex Reserves : परकी चलनसाठ्याचा सार्वकालिक उच्चांक

Foreign Exchange Reserves : स्पेशल ड्रॉइंग राइट्समध्येही (एसडीआर) ४.३ कोटी डॉलरने वाढ होऊन तो १८.१६१ अब्ज डॉलरवर गेला आहे.
Forex Reserves
Forex ReservesSakal
Updated on

मुंबई : देशाच्या परकी चलन गंगाजळीने सात जून रोजी संपलेल्या आठवड्यात ६५५.८१७ अब्ज डॉलरच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात चलनसाठ्यात ४.३०७ अब्ज डॉलरची भर पडली आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

या आधीच्या अहवाल आठवड्यात चलनसाठा ४.८३७ अब्ज डॉलरने वाढून ६५१.५१ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. यापूर्वीचा दहा मे रोजी चलनसाठ्याने ६४८.८७ अब्ज डॉलरचा उच्चांक नोंदवला होता. गेल्या काही आठवड्यांत, राखीव चलनसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सात जून रोजी संपलेल्या आठवड्यात, गंगाजळीचा एक प्रमुख घटक असलेल्या परकी चलन मालमत्तेत ३.७७३ अब्ज डॉलरने वाढ होऊन ती ५७६.३३७ अब्ज डॉलरवर गेली, तर सोन्याचा साठा ४८.१ कोटी डॉलरने वाढून ५६.९८२ अब्ज डॉलर झाला.

स्पेशल ड्रॉइंग राइट्समध्येही (एसडीआर) ४.३ कोटी डॉलरने वाढ होऊन तो १८.१६१ अब्ज डॉलरवर गेला आहे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताची राखीव स्थिती एक कोटी डॉलरने वाढून ४.४३६ अब्ज डॉलर झाली आहे.

परकी चलनाच्या गंगाजळीत झालेली वाढ अर्थव्यवस्थेची भक्कम स्थिती प्रतिबिंबित करते. रुपया अस्थिर झाल्यावर रिझर्व्ह बँक त्याच्या स्थिरतेसाठी मदत करते. घसरत चाललेल्या परकी चलनसाठ्यामुळे रुपयाला चालना देण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला कमी संधी मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.