Shankh Air: आणखी एक विमान कंपनी आकाशात उडण्यासाठी सज्ज; मंत्रालयाने दिली मंजुरी

Shankh Air Gets Approval: देशाची आणखी एक विमान कंपनी आकाशात उडण्यासाठी सज्ज झाली आहे. या विमान कंपनीचे नाव शंख एअर आहे. शंख एअरला नागरी उड्डान मंत्रालयाकडून देशात काम करण्याची परवानगी मिळाली आहे.
Shankh Air Gets Approval
Shankh Air Gets ApprovalSakal
Updated on

Shankh Air Gets Approval: देशाची आणखी एक विमान कंपनी आकाशात उडण्यासाठी सज्ज झाली आहे. या विमान कंपनीचे नाव शंख एअर आहे. शंख एअरला नागरी उड्डान मंत्रालयाकडून देशात काम करण्याची परवानगी मिळाली आहे.

मंत्रालयाच्या मंजूरी पत्रानुसार, कंपनीला एफडीआय इत्यादी नियमांच्या संबंधित तरतुदींचे तसेच या संदर्भात इतर नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकृतपणे उड्डान सुरू करण्यापूर्वी एअरलाइनला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून मंजुरी आवश्यक असेल.

उत्तर प्रदेशातील पहिली विमान कंपनी

शंख एअर ही उत्तर प्रदेशची पहिली एअरलाइन कंपनी असेल. त्याचे केंद्र लखनौ आणि नोएडा येथे आहे. कंपनीचे राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

Shankh Air Gets Approval
JSW Group: सज्जन जिंदाल यांचा मोठा निर्णय! 40,000 कोटींचा ईव्ही प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवणार

इंडिगोचे बाजारावर वर्चस्व

इंडिगोचा सध्या भारताच्या एव्हिएशन मार्केटमध्ये 60% पेक्षा जास्त हिस्सा आहे, ज्यामुळे ती देशातील सर्वात मोठी एअरलाइन बनली आहे. ही विमानसेवा सातत्याने विस्तारत आहे.

याशिवाय देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाचा विस्तारही वेगाने होत आहे. सध्या टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या सह-मालक असलेल्या विस्तारा पुढील वर्षापर्यंत विलीन करण्याची एअरलाइनची योजना आहे.

Shankh Air Gets Approval
Stock Market vs Gold: सोने की शेअर बाजार, कोण करणार मालामाल? काय सांगतात तज्ज्ञ

छोट्या विमान कंपन्यांचा विस्तार

छोट्या विमान कंपन्या आता त्यांचा विस्तार करण्यावर भर देत आहेत. गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेडने गेल्या वर्षी मे महिन्यात आपले ऑपरेशन बंद केले. त्याचवेळी स्पाइसजेटला वाढत्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

स्पाइसजेटचा बाजार हिस्सा जानेवारी 2023 मध्ये 5.6% वरून 2.3% पर्यंत कमी झाला आहे. 2021 मध्ये एअरलाइनचा बाजारातील हिस्सा 10.5% होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.