Apple CEO Tim Cook: अँपलचे सीईओ टिम कुक यांचे भारतीय संस्कृतीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, भारतात इतिहास...

अँपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर 18 एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे.
Apple CEO Tim Cook
Apple CEO Tim CookEsakal
Updated on

Apple CEO Tim Cook: या आठवड्यात मुंबई आणि दिल्ली येथे अॅपलचे पहिले दोन रिटेल स्टोअर उघडून मोठा विस्तार करण्याआधी, Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारताच्या संस्कृती आणि उर्जेबद्दल कौतुक व्यक्त केले.

कूक म्हणाले की, “भारतात खूप सुंदर संस्कृती आणि एक अविश्वसनीय ऊर्जा आहे, आणि आम्ही आमच्या दीर्घकालीन इतिहासाची उभारणी करण्यास उत्सुक आहोत. ग्राहकांना पाठिंबा देणे आणि सेवा देणाऱ्या नवकल्पनांसह चांगले भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करणार आहोत"

ते पुढे म्हणाले की Apple चे ध्येय "जीवन समृद्ध करणे आणि जगभरातील लोकांना सक्षम करणे" आहे. Apple ने 2017 मध्ये भारतात iPhones तयार करण्यास सुरुवात केली. Apple च्या भारतातील भागीदार पुरवठादारांमध्ये Foxconn, Wistron आणि Pegatron यांचा समावेश आहे, ते जुने मॉडेल iPhone 14 चे उत्पादन करत आहेत.

आयफोनच्या जागतिक पुरवठ्यापैकी फक्त 5% पुरवठा भारतातून होतो, अहवालानुसार Apple ही संख्या 2025 पर्यंत 25% आणि 2027 पर्यंत 50% पर्यंत नेण्याची योजना आखत आहे.

Apple CEO Tim Cook
Amul vs Nandini: अमूल-नंदिनी वादात राहुल गांधींची एंन्ट्री; ट्विट करत म्हणाले; कर्नाटकची...

कंपनीचा दावा आहे की ते सर्व भारतीय पुरवठादारांसोबत काम करत आहेत आणि त्यातून देशभरात लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत.

अँपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर 18 एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे. बीकेसीमधील रिलायंन्स जिओ वर्ल्डमध्ये अॅपल स्टोअर सुरु होईल. तर दुसरे एपल स्टोर 20 एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत भागात उघडणार आहे. अॅपल कंपनीने ही माहिती दिली आहे.

ऑफलाईन रिटेल हा महत्वाचा टप्पा असून, बहुसंख्य भारतीय ग्राहक उत्पादन खरेदीचा विचार करण्यापुर्वी त्या उत्पादनांना समजून घेणे, स्पर्श करणे, एक्पोर करणे आवडते.

अॅपल स्टोरची सेवा ही जागतिक दर्जाची असून, हे स्टोअर भारतीय बाजारपेठेत अॅपल उत्पादनाचे मार्केट वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

महत्वाचे म्हणजे या स्टोअरमध्ये एकाच छताखाली अॅपल उत्पादनांची एकोसिस्टिम,सुटे भाग मिळणार आहे. भारतीय ग्राहक या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टोअरमध्ये वस्तु विकत न घेता, तो भन्नाट अनूभव घेऊ शकतील, असं या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

Apple CEO Tim Cook
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.