२०२४ च्या पहिल्या सहामाहीत आलिशान गृहनिर्माणाने रिअल इस्टेट बाजारपेठेचा मोठा भाग व्यापला आहे. आतापर्यंत स्वस्तातील परवडणारी घरे भारताच्या गृहनिर्माण बाजाराचा कणा राहिली आहेत. परंतु आता दिसत असलेल्या प्रवाहाने आलीशान घरांची बाजारपेठ स्वस्त घरांच्या वाढीच्या पुढे जाईल का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.