Gold Import Duty: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंवर आयात शुल्क वाढवले आहे. अर्थ मंत्रालयाने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 12.50 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे. याशिवाय मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या नाण्यांवरील कस्टम ड्युटीही वाढवण्यात आली आहे.
आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किंमतींपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत आयात शुल्क वाढल्याने किंमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
सोन्या-चांदीशी संबंधित लहान घटक जसे की हुक, क्लॅस्प, पिन, कॅच आणि स्क्रूवर आयात शुल्क वाढले आहे. हे लहान घटक सामान्यत: दागिन्यांचा तुकडा किंवा भाग ठेवण्यासाठी वापरले जातात.
नवीन आयात शुल्क कधी लागू होईल?
आयात शुल्काचे नवे दर 22 जानेवारीपासून म्हणजेच काल सोमवारपासून लागू झाले आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाला आता 8 दिवस शिल्लक आहेत आणि ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्याऐवजी 22 जानेवारीपासूनच त्याची अंमलबजावणी केली आहे.
या बदलाचा उद्देश आयात नियंत्रित करणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. त्याच वेळी, GJEPC (Gem and Jewellery Export Promotion Council) सोन्या-चांदीवरील आयात शुल्क सध्याच्या 15 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याची मागणी करत आहे.
अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये, कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील सीमाशुल्क सध्याच्या 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.