D Subbarao: तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतरही भारत गरीबच राहणार; असं का म्हणाले RBIचे माजी गव्हर्नर?

3rd Largest Economy: 2029 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तरी भारत गरीब देश राहू शकतो. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सोमवारी ही भीती व्यक्त केली. त्यामुळे या विषयावर आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
D Subbarao
3rd Largest EconomySakal
Updated on

3rd Largest Economy: 2029 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तरी भारत गरीब देश राहू शकतो. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सोमवारी ही भीती व्यक्त केली. त्यामुळे या विषयावर आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. सुब्बाराव यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सौदी अरेबियाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, श्रीमंत देश होणे म्हणजे विकसित राष्ट्र होणे नव्हे.

आरबीआयच्या माजी गव्हर्नरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ दिला. त्यांनी अनेकदा सांगितले आहे की, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर भारत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ते म्हणाले की अनेक अर्थतज्ञांचा असा अंदाज आहे की अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. (India May Still Remain Poor Even After Becoming 3rd Largest Economy Says Ex-Rbi Chief D Subbarao)

D Subbarao
Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता; गेल्या 9 दिवसांत झाली एवढी वाढ

सुब्बाराव म्हणाले, 'मला वाटते की हे शक्य आहे (भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे), पण ही काही आनंदाची गोष्ट नाही. कारण आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत कारण आपण 1.40 अब्ज लोक आहोत. आणि लोक उत्पादनाचा घटक आहेत. आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत कारण आमल्याकडे लोक आहेत. पण तरीही आपण गरीब देश आहोत. ते म्हणाले की, भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

BRICS आणि G-20 देशांमध्ये भारत सर्वात गरीब

सुब्बाराव म्हणाले की, या बाबतीत भारत 139 व्या क्रमांकावर आहे ज्याचे दरडोई उत्पन्न 2,600 डॉलर आहे. BRICS आणि G-20 देशांमध्ये भारत सर्वात गरीब आहे. विकास दराला गती दिली पाहिजे आणि नफा सर्वांमध्ये वितरीत केला गेला पाहिजे. तरच भारताची प्रगती होईल.

D Subbarao
Tesla Layoff: इलॉन मस्कचा धक्कादायक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

सुब्बाराव यांनी पंतप्रधानांच्या त्या विधानाची आठवण करून दिली ज्यात ते म्हणाले होते की भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनायचे आहे. माजी सुब्बाराव यांच्या मते, विकसित राष्ट्र होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत कायद्याचे राज्य, मजबूत राज्य, जबाबदारी आणि स्वतंत्र संस्था महत्त्वाच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.