India Retail Inflation: किरकोळ महागाई निर्देशांक ५.६९ टक्क्यांवर

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) ५.६९ टक्के इतका नोंदविला गेला.
Inflation
Inflation Sakal
Updated on

नवी दिल्ली: ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) ५.६९ टक्के इतका नोंदविला गेला. किरकोळ महागाई निर्देशांकाची ही गत चार महिन्यातील उच्चांकी पातळी आहे.

नोव्हेंबरमध्ये सीपीआय निर्देशांक ५.५५ टक्के इतका होता. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये हा निर्देशांक वाढून ५.६९ टक्के इतका झाला. खाद्यान्न श्रेणीतील वस्तूंच्या किमतीत ९.५३ टक्क्याने वाढ झाली आहे. महागाई दर चढा असल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात हस्तक्षेप होणार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inflation
PM Modi Nashik: भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये कसा आला? नाशिकमध्ये मोदींनी सांगितलं कारण

डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातील महागाई निर्देशांक ५.९३ टक्के तर शहरी भागातील सीपीआय निर्देशांक ५.४६ टक्के इतका नोंदवला गेला. डिसेंबरमध्ये भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्या तुलनेत इंधन आणि ऊर्जा श्रेणीचा निर्देशांक स्थिर होता. (Latest Marathi News)

Inflation
Budget 2024: मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.